Gold Silver Rate Increase: सोनं महागलं; चांदीही चकाकली; जाणून घ्या मुंबईसह तुमच्या शहरातील भाव

Gold Silver rate 13 June 2024: सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तुमच्या शहरातील सोने-चांदीचे भाव जाणून घ्या.
Gold Silver Rate Increase
Gold Silver Rate IncreaseSaam Tv

जून महिन्यात वटपोर्णिमा सण असतो. वटपोर्णिमेसाठी पत्नी आपल्या पतीसाठी उपवास धरतात. वटपोर्णिमेला अनेकजण आपल्या बायकोला खास भेटवस्तू देतात. वटपोर्णिमेला अनेकजण सोन्याची एखादी वस्ती बायकोला देतात. जर तुम्हीही बायकोला सोन्याची वस्तू गिफ्ट म्हणून देणार असाल तर सर्वप्रथम सोने-चांदीचे दर चेक करा. काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत.

आज सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. प्रति किलो सोन्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतदेखील प्रति किलो १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

आज भारतात २१ कॅरेट सोने ६६,१६० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. तर १०० ग्रॅम सोने ६,६१,६०० रुपयांनी विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोने ५२,९२८ रुपयांमा विकले जात आहे. काल एक तोळे सोने ६६,१५० रुपयांना विकले जात होते.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

देशात २४ कॅरेट सोने प्रति तोळा ७२,१७० रुपयांना विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोने ५७,७३६ रुपयांना विकले जात आहे. १०० ग्रॅम सोने ७,२१,७०० रुपयांना विकले जात आहे. १०० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Silver Rate Increase
Petrol Diesel Price: आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

चांदीचे भाव

देशात ८ ग्रॅम चांदीची किंमत ७३१.२० रुपये आहे.१०० ग्रॅम चांदी ९,१४० रुपयांनी विकली जात आहे. तर १ किलो चांदीची किंम ९१,४०० रुपये आहे. काल १ किलो चांदी ९१,४०० रुपयांना विकली जात होती.

Gold Silver Rate Increase
Tata Motors: मजेंटा मोबिलिटी टाटा मोटर्समध्ये आणखी एक करार; १००हून अधिक टाटा एस ईव्हीचा आपल्या ताफ्यात केला समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com