Petrol Price Saam Tv
बिझनेस

Petrol Price: पेट्रोल डिझेलवर टॅक्स नसेल तर १ लिटरची किंमत किती? वाचा सविस्तर

Petrol Price Without Tax: पेट्रोल डिझेलच्या रोज नवीन किंमती जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर वॅट कर आकारला जातो. यामुळे इंधनाचे दर वाढतात.त

Siddhi Hande

पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय?

पेट्रोल डिझेलवर किती टक्के कर आकारला जातो?

पेट्रोल डिझेलवर कर आकारल्यामुळे ते किती महाग होते?

देशातील तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर जीएसटी लागत नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर एक्साइज ड्यूटी लावली जाते. यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होते. कच्च्या तेलाच्या किंमती या कमी असतात. मात्र, त्यावर एक्साइज ड्युटी लागते त्यानंतर कमिशन चार्जेस लावले जातात. दरम्यान, कर न लावता पेट्रोल डिझेलचे दर किती असतात ते जाणून घ्या. (Petrol Diese Rate)

पेट्रोल डिझेलवर सध्या वॅट दर आकारला जात आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. दरम्यान, जर हे कर लादले नाही तर पेट्रोल डिझेलचे दर खूप कमी आहेत. याचसोबत कमिशन वैगेरे आणि डीलर्सच्या किंमती यामुळे इंधनाचे दर वाढतात. दरम्यान, जर पेट्रोल डिझेलवर कोणताही कर लावला नाही तर हे दर अर्धे होतील. जवळपास पेट्रोलचे दर ५५.६६ रुपये आहेत. हे दर कोणत्याही टॅक्सशिवाय आहेत.

पेट्रोल डिझेलवर कोणता टॅक्स लागतो? (Which Tax Apply On Petrol Diesel)

भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर ४ घटकांचा परिणाम होतो. सर्वात आधी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे लागणारी एक्साइज ड्युटी, वॅट टॅक्स, डीलर कमीशन आणि चार्ज या गोष्टी आहेत.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर काय?

आज मुंबईत पेट्रोलचे दर १०३.०५ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आहेत.

पेट्रोल डिझेलचे खरी किंमती काय? (Petrol Diesel Real Price)

दिल्लीत पेट्रोलची डीलर किंमत ५५.६६ रुपये आहे. दरम्यान, टॅक्स आणि चार्ज लावून ग्राहकांना ९४.७२ रुपये लिटर विकले जाते. जर टॅक्स लावला नाही तर पेट्रोलची किंमत ५५.६६ रुपये आहे.

क्रूड ऑइलची किंमत किती? (Crude Oil Price Today)

क्रूड ऑइलची किंमत ४० रुपये प्रति लिटर आहे. त्यावर मार्केटिंग कंपन्या ५.६६ रुपये प्रोसेसिंग कॉस्ट लावतात. याचसोबत बफर इंफ्लेशन १० रुपये प्रति लिटर असते. त्यानंतर पेट्रोल डिलर्संना ५५.६६ रुपये प्रति लिटर मिळते.

पेट्रोल डिझेलचे दर कोण ठरवतात?

रोज सकाळी देशातील इंधन कंपन्या हे पेट्रोल डिझेलचे नवे दर ठरवतात. हे पेट्रोल डिझेलचे दर कच्च्या तेलाच्या आधारे ठरवले जातात.

महाराष्ट्रात सर्वाधिक महाग पेट्रोल कुठे मिळते?

मीडिया रिपोर्टनुसार, सर्वाधिक महाग पेट्रोल हे परभणी येथे मिळते. परभणीनंतर नांदेड आणि लातूरमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Movie: आग्रा स्वारीचे शौर्य पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा ट्रेलर थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

Reduce Electricity Bill : तुम्हालाही लाईट बील प्रमाणाच्या बाहेर येतय? कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT