Pashu Aushadhi scheme saam tv
बिझनेस

Pashu Aushadhi scheme: गुरांनाही मिळणार स्वस्तात औषध! सरकारच्या 'पशुवैद्यक केंद्रा'चा कसा घेणार लाभ?

Pashu Aushadhi scheme: सरकारने भारतातील पशुपालकांसाठी एक नवीन योजना आणलीय. याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पशुधनाचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. जाणून घ्या तुम्हाला या योजनेचा कसा फायदा होईल.

Bharat Jadhav

भारतात पशुसंवर्धन आणि दुग्धोद्योग हे करोडो लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे, परंतु प्राण्यांच्या आरोग्याकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नाही. सरकारने आता या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. जनऔषधी केंद्रांच्या धर्तीवर देशभरात “पशुवैद्यकीय औषध केंद्रे” उघडली जातील. तेथे प्राण्यांसाठी स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश पशुपालकांना मदत करणे आणि गुरांचे आरोग्य सुधारणे हा आहे.

सरकारच्या या नव्या योजनेचा लाभ कसा फायदा होईल, हे जाणून घेऊ. ही योजना प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांसारखी (PMBJK) असणार आहे. येथे माणसांप्रमाणे परवडणारी आणि दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जेनेरिक औषधांव्यतिरिक्त, पारंपारिक वैद्यकीय प्रणालीवर आधारित एथनोव्हेटेरिनरी औषध देखील पशुवैद्यकीय औषध केंद्रांवर उपलब्ध असणार आहेत.

ही योजना केंद्र सरकारच्या पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमाचा (LHDCP) भाग आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय.२०१९ च्या २० व्या पशुधन गणनेनुसार, भारतातील एकूण पशुधनाची लोकसंख्या ५३.५७ कोटी आहे. यामध्ये ३०.२७ कोटी गोवंश (गाय, म्हैस, मिथुन आणि याक) चा समावेश आहे. जनावरांचे आरोग्य सुधारण्यासाठी पशुवैद्यकीय केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सहकारी संस्था आणि प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे (PMKSK) पशु औषध केंद्रे चालवली जातील. पशुपालकांना सुरळीतपणे औषधे मिळावीत यासाठी शासन लवकरच ही केंद्रे चालवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहेत. आधुनिक जेनेरिक औषधांसोबतच पारंपरिक वैद्यकीय पद्धतींवर आधारित औषधेही या केंद्रांवर उपलब्ध असणार आहेत.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ने अनेक रोगांसाठी एथनोव्हेटेरिनरी फॉर्म्युलेशन विकसित केले आहे ज्याचा उपयोग FMD तोंडातील फोड, FMD पायाचे फोड/घव, ताप, अतिसार, सूज आणि अपचन आणि कृमी यांसारख्या गुरांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

Latur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी लातूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | VIDEO

SCROLL FOR NEXT