PAN Card Rule Change google
बिझनेस

PAN Card Update : केवळ आधार कार्ड वापरून पॅन कार्ड बनवता येणार नाही; 'या' कागदपत्रांचीही गरज लागणार; पण कधीपासून?

Income Tax India: 1 एप्रिलपासून पॅन कार्डसाठी आधार एकटाच पुरेसा ठरणार नाही. जन्मतारखेचा पुरावा आवश्यक असेल. 31 मार्चपर्यंत अर्ज केल्यास जुन्या नियमांनुसार पॅन मिळवण्याची संधी उपलब्ध आहे.

Sakshi Sunil Jadhav

देशातील PAN कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. 31 मार्चनंतर नागरिकांना फक्त आधार कार्डच्या पुराव्याने PAN कार्ड बनवता येणार नाही. 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार आहेत. त्यामध्ये PAN कार्डासाठी अर्ज करताना जन्मतारखेचा पुरावा देणारे कागदपत्र सादर गरजेचं असणार आहे.

पॅन कार्डाची ही माहिती CSCeGov यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टनुसार 1 एप्रिलपासून PAN कार्डसाठी जुने अर्ज फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे ज्यांनी अजुनही PAN कार्ड बनवलेलं नाही, त्यांनी 31 मार्चआधीच अर्ज केल्यावर फक्त आधार कार्डावर प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

सध्या PAN कार्ड बनवण्यासाठी आधार कार्डच्या मदतीने e-KYC पद्धत वापरून अर्ज करणं सोपं पडणार आहे. या प्रक्रियेत अर्जदाराला वेगळे फोटो किंवा स्वाक्षरी अपलोड करण्याची गरज लागत नाही. पण 1 एप्रिलपासून हा नियम बदलला जाणार आहे. अर्ज करताना जन्मतारखेचा अधिकृत पुरावा देणे आवश्यक महत्वाचे असणार आहे.

1 एप्रिलपासून PAN कार्डासाठी अर्ज करताना जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, दहावीचा रिजल्ट किंवा प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मजिस्ट्रेट शपथपत्र किंवा पासपोर्ट यांसारखी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. यामुळे फक्त आधार कार्डावर PAN बनवण्याची सुविधा संपुष्टात येणार आहे.

नागरिकांना 31 मार्चपर्यंत PAN कार्ड बनवण्याची सुवर्णसंधी आहे. या कालावधीत अर्ज केल्यास केवळ आधार कार्डच्या सहाय्याने सहज PAN कार्ड मिळवता येऊ शकते. त्यामुळे ज्यांना PAN कार्ड बनवायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऑनलाइन PAN कार्डसाठी अर्ज करण्यासाठी NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Apply Online’ पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर Form 49A निवडून आवश्यक वैयक्तिक माहिती भरावी लागते. आधार OTP द्वारे पडताळणी करून आणि शुल्क भरल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

नवीन नियम लागू झाल्यानंतर PAN कार्ड बनवण्याची प्रक्रिया जास्त कडक होणार असल्याने नागरिकांनी वेळेत अर्ज करणे त्यांचा फायद्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बची धमकी

Raj Thackeray: मनसेच्या इंजिनने पक्ष कार्यक्रमाचा 'गिअर' बदलला; आता आंदोलन नव्हे सत्ता हवी; नव्या रणनीतीचा राज ठाकरेंना फायदा होणार?

Mumbai Police: मुंबई हादरली! पोलिस मुख्यालयात पोलिसाची आत्महत्या, सुसाइड नोटमधून धक्कादायक कारण समोर

भाजप खासदाराच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान भिमाशंकरमध्ये आग

बाजारात आला बजेट फ्रेंडली फोन! दमदार बॅटरी, शानदार कॅमेरा अन् बरंच काही...,जाणून घ्या Samsung Galaxy M17e 5G चे फीचर्स

SCROLL FOR NEXT