OnePlus Buds Pro 3 SAAM TV
बिझनेस

OnePlus Buds Pro 3 : स्टायलिश लूक अन् उत्तम फीचर्ससह One Plus चे नवे इयरबड्स लाँच होणार; १० मीटर अंतरावरही सहज होणार कनेक्ट

New Airpods Launch : OnePlus लवकरच नवीन इयरबड्स लाँच करणार आहे. हे इयरबड्स सर्वोत्तम फीचर्सनी समृद्ध आहे. सविस्तर माहिती वाचा.

Shreya Maskar

आपला रोजचा प्रवास इयरबड्स शिवाय अशक्य असतो. इयरबड्समुळे प्रवास सुखकर होऊन जातो. आजकाल इयरबड्समध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. कंपन्या नवीन फीचर्स सोबत इयरबड्स लाँच करत आहेत. वायरपासून ते ब्लूटूथ कनेक्टपर्यंत इयरबड्समध्ये बदल झालेले आहे. अशात आता वनप्लस नवीन भन्नाट फीचर्सने समुद्ध इयरबड्स लाँच करत आहे.

वनप्लस लवकरच आपले नवीन इयरबड्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. OnePlus Buds Pro 3 ची लॉन्च तारीख जाहीर करण्यात आली आहे.

इयरबडचे वैशिष्ट्ये

  • इयरबड्समध्ये ANC हे फीचर आहे.

  • ब्लूटूथ 5.3 व्हर्जन

  • Dynaudio सह टॉप क्लास साउंड

  • नवीन डिझाइनची केस

  • पर्सनलाइज्ड नॉइज़ कंट्रोल

  • इयरबड्समध्ये 50dB पर्यंत आवाज दाबण्याची क्षमता

  • डबल नॉईज कॅन्सलिंग तंत्र

  • स्मार्ट ॲडॅप्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन

  • 10 मीटरच्या अंतरापर्यंत बड्स सहजपणे डिव्हाइसशी कनेक्ट होऊ शकतात.

कधी होणार इयरबड्स लाँच?

मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Buds Pro 3 नवीन इयरबड्स 20 ऑगस्ट 2024 रोजी लाँच करण्यात येणार आहे.

किंमत काय?

अद्याप कंपनीने इअरबडची किंमत जाहीर केली नसून ती 20 ऑगस्ट 2024 रोजी सांगण्यात येईल. पण OnePlus Buds Pro 2 ची किंमत 11999 रुपये होती. या तुलनेत OnePlus Buds Pro 3 ची किंमत 13 ते 14 हजार असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT