Today Gold Price Hike  Saam TV
बिझनेस

Gold Price Today : नव्या वर्षात सलग तिसऱ्या दिवशी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री; सोन्याचे भाव कडाडले, पाहा आजचा दर

Gold Rate Today : या दिवसांमध्ये सोन्याला अधिक मागणी असते. आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव कडाडले होते. तर आज नव्या वर्षाच्या तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. नवीन वर्षासोबत अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम देखील सुरु असून या दिवसांमध्ये सोन्याला अधिक मागणी असते. आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ३ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,93,500 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,275 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,200 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,750 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,27,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,93,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,350 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,480 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,935 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,260 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,920 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,260 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,920 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,260 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,920 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,260 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,920 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,260 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,920 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,260 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,920 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,260 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,920 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,263 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,923 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,263 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,923 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,263 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,923 रुपये

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT