Laptop smartphone features SAAM TV
बिझनेस

Smartphone: अगदी 5 वर्ष जुन्या स्मार्टफोनचा डिस्प्ले दिसेल नवीन; फक्त करा 'या' ५ सेटिंग्ज

smartphone features: तुम्ही वापरत असलेली डिजीटल उपकरणे जुनी झाली असतील तर ही बातमी तुमच्यासाठी.

Saam Tv

आजचे युग विज्ञान तंत्रज्ञानाचे आहे. अगदी जन्माला येण्यापासून ते मरेपर्यंत आपण तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्यासह आता सगळेच स्मार्ट डिवाईसेस वापरायला लागले आहेत. त्यात स्मार्ट फोन, लॅपटॉप, टी.व्ही, घड्याळ याचा आपण वापर करतो. मात्र बऱ्याच वेळेस यांचा डिसप्ले बिघडतो आणि आपल्याला हवी तशी गुणवत्ता मिळत नाही. आता याची चिंता सोडा आणि घरीच तुमच्या लॅपटॉपची, मोबाईलची क्वालीटी वाढवा.

ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट समान ठेवा

तुमच्या स्क्रिनचा ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट यांची एक समान लेवल सेट करणे गरजेचे आहे. जास्त ब्राइटनेस ठेवल्यास डोळ्यांवर ताण येतो. तर कमी ब्राइटनेसने स्क्रिन चांगली दिसत नाही म्हणून टिव्ही किंवा मोबाईलचा ब्राइटनेस लेवल ऑटोवर ठेवा. त्याने तुम्हाला सतत ब्राइटनेस कमी जास्त करावा लागणार नाही.

तुमच्या स्क्रिनचे कलर टेम्परेचर

तुमच्या स्क्रिनचे कलर टेम्परेचर सुधारा. त्यात योग्य रंगाची निवड करा. तुम्ही यात 'विविड' किंवा 'मूव्ही' हे मोड वापरु शकता. तुमच्या टीव्ही किंवा लॅपटॉपवर ' कस्टम कलर' सेट करा.

रिझोल्युशन किती ठेवाल?

डिसप्लेचे रिझोल्यूशन जितके जास्त असेल तितकी स्क्रिन चांगली दिसेल आणि क्लियर दिसेल. सध्याच्या उपकरणांमध्ये फुल एचडी आणि 4K रिझोल्यूशन सेट करणे महत्वाचे आहे.

ऑडिओ-व्हिज्युअल केबल्स वापरा

HDMl केबलचा वापर केल्याने तुम्हाला 4K डिसप्लेचा आनंद घेता येऊ शकतो. HDMI जुन्या VGA किंवा इतर केबल्सपेक्षा डिसप्ले आणि ध्वनीच्या गुणवत्तेत अधिक सुधारणा प्रदान करते.

ब्लू लाइट फिल्टरचा वापर

तुमच्या नकळत तुमच्या रोजच्या स्किन टाईममुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्ही लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमध्ये ब्लू लाइट फिल्टरचा वापर करु शकता. त्याने तुम्हाला उत्तम क्वालिटीमुळेच आणि तुमच्या डोळ्यांचे संरक्षण सुद्धा होईल.

Written By: Sakshi Jadhav

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT