Electric Two-Wheelers Under New EV Policy 2025 Saamtv
बिझनेस

Electric Cars: लय भारी! इलेक्ट्रिक टू-व्हीलरसह कार, टॅक्सी, ट्रकसाठी सब्सिडी

New EV Policy 2025 : इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन धोरण आखण्यात आलंय. मसुद्यांतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर अनुदान जाहीर करण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

  • ओडिशा सरकारने इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीदारांसाठी सब्सिडी जाहीर केली.

  • नवीन ईव्ही धोरण २०२५ मसुद्यात ही तरतूद समाविष्ट आहे.

  • इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी आणि वाहने खरेदीसाठी राज्य सरकार अनेक योजना आणत आहे. ओडिसा सरकारदेखील या वाहनांवरील अनुदान वाढवणार आहे. कार, टॅक्सीसह बाईकच्या खरेदीसाठी राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने त्यांच्या नवीन ईव्ही धोरण २०२५ च्या मसुद्यात ही तरतूद समाविष्ट केलीय.

मते आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर अनुदान देण्याची तरतूद पाच वर्षांसाठी लागू केली जाईल.ओडिशा सरकारने राज्यात इलेक्ट्रिक दुचाकींच्या नोंदणीसाठी अनुदान २०००० वरून ३०००० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सरकार राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या नोंदणीवर प्रति किलोवॅट ताशी बॅटरी क्षमता असलेल्या बाईकच्या खरेदीवर ५००० रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या अनुदानाची कमाल मर्यादा ३०००० रुपये असणार आहे.

आता जास्त बॅटरी क्षमता असलेले इलेक्ट्रिक स्कूटर आणि दुचाकी बाजारात आल्या आहेत, त्यामुळे सरकारने त्यानुसार अनुदानाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतलाय. दुचाकींव्यतिरिक्त ओडिशा सरकार बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी, चार चाकी, टॅक्सी, ट्रक आणि बसेससाठी देखील अनुदान देते. या नवीन ईव्ही धोरण २०२५ अंतर्गत, जे २०३० पर्यंत तेही लागू असेल, असे अधिकाऱ्याने सांगितले. सरकार इलेक्ट्रिक बसेसच्या नोंदणीसाठी ₹ 20 लाखांचे प्रोत्साहन देखील देईल.

पॉलिसी दस्तऐवजानुसार हा लाभ ओडिशाचे कायमचे रहिवासी असलेल्यांना मिळेल. प्रत्येक लाभार्थी प्रत्येक इलेक्ट्रिक वाहन विभागात फक्त एकदाच खरेदी प्रोत्साहनाचा लाभ घेऊ शकणार आहे. ईव्ही धोरणाच्या मसुद्यात या विभागातील संशोधन आणि विकास (आर अँड डी) उपक्रमांना निधी देण्यासाठी ₹१५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT