Scheme  Saam Tv
बिझनेस

NSC Scheme: वर्षाला ६० हजार गुंतवा, मॅच्युरिटीनंतर ४६.६७ लाख तुमचेच; सरकारची भन्नाट योजना एकदा पाहाच

NSC Scheme A Smart Investment: देशात अनेक अशा सरकारी योजना आहेत ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरतात. अशाच योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना.

Bhagyashree Kamble

देशात अनेक अशा सरकारी योजना आहेत ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरतात. यातील काही योजना बचतीसह निश्चित उत्पन्न मिळवण्याची संधी देखील देतात. अशाच योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना. ही योजना विशेषतः लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते. चक्रवाढ व्याजामुळे आपल्याला फायदा मिळतो.

पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत आपल्याला कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळू शकतो. नवीन नियमांनुसार, यात काही बदल करण्यात आले आहे. दरवर्षी ₹60,000 या योजनेत गुंतविल्यास पाच वर्षांच्या कालावधीत ही रक्कम ₹43.47 लाखांपर्यंत वाढू शकते. चक्रवाढ व्याजामुळे आपल्याला याचा फायदा होतो.

पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेतील प्रमुख वैशिष्ट्य

सरकारकडून ठरवलेला निश्चित व्याजदर.

आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत लाभ.

मॅच्युरिटीनंतर पुन्हा गुंतवणुकीची सुविधा.

किमान १००० रूपयांपासून गुंतवणूकीची सुरूवात.

भारतभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध.

वार्षिक चक्रवाढ व्याजामुळे अधिक परतावा.

प्रत्येक वर्षी ₹60,000 गुंतवल्यास, वार्षिक चक्रवाढ व्याजामुळे गुंतवणुकीच्या शेवटी परताव्याची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे पाच वर्षांनंतर एकूण रक्कम ₹43.47 लाखांपर्यंत पोहोचते. या योजनेचा नक्कीच सामान्यांना फायदा होऊ शकतो.

एनएससी का निवडावे?

सरकारी पाठिंब्यासह सुरक्षित गुंतवणूक.

बाजारातील परिस्थिती काहीही असो, स्थिर परतावा.

नियमित बचतीच्या सवयीला प्रोत्साहन.

सर्व वयोगटांसाठी योग्य योजना.

जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श पर्याय.

आर्थिक शिस्तीला चालना देणारी योजना.

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड

पासपोर्ट आकाराचे फोटो

बँक खात्याची माहिती

एनएससीमध्ये गुंतवणूक कशी करावी?

तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन एनएससी खाते उघडू शकता. तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि गुंतवणुकीची रक्कम घेऊन जावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

iPhone 17: आयफोन १७ केवळ २ दिवसांत लाँच होणार, किंमत आणि फीचर्स चर्चेत

Chandra Grahan 2025: आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; तब्बल ८२ मिनिटं दिसणार Blood Moon, जाणून घ्या सुतक काळ

SCROLL FOR NEXT