Cash Withdrawal Saam Tv
बिझनेस

Cash Withdrawal: आता कार्डची झंझट संपली! आता आधार कार्डनेही काढा पैसे, ही सोपी स्टेप करा फॉलो

Cash Withdrawal By Using Aadhaar Card: प्रत्येकजण सध्या डिजिटल पेमेंटचा वापर करतात. परंतु रोख रक्कम ही नेहमी आवश्यक असते. आता तुम्ही आधार कार्ड नंबरवरुन रोख रक्कम काढू शकतात.

Siddhi Hande

आजकाल सर्वत्र डिजिटल पेमेंटचा ट्रेंड सुरु आहे. भाजी घेण्यापासून ते कोणालाही पैसे पाठवायचे असतील तर यूपीआयचा वापर केला जातो. परंतु अनेक कामे अशी असतात की ज्यासाठी रोख रक्कम आवश्यक असते. रोख रक्कम काढण्यासाठी आपण एटीएमचा वापर करतो. एटीएममध्ये जाऊन काही मिनिटांत आपण पैसे काढू शकतो. दरम्यान, आता तुम्ही आधार कार्डवरुनदेखील पैसे काढू शकतात.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूजर्सला AEPS (Aadhaar Enabled Payment System)ऑफर केला आहे.या सर्व्हिसमुळे यूजर्स आधार नंबर आणि बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनमुळे बँकिंगसंबंधित अनेक कामे केली जातात. यामध्ये कॅश विड्रॉल,बँलेंस चेक, मायक्रो एटीएम आणि फंड ट्रान्सफरसाठी वापरले जाते. (Cash Withdrawl)

आधार कार्डच्या मदतीने पैसे कसे काढायचे? (How To Withdraw Cash Using Aadhaar Card)

आधार कार्ड आणि बँक अकाउंट जर लिंक असेल तर तुम्ही पैसे काढू शकतात. यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करा

१. AEPS सपोर्ट करणाऱ्या बँकिंग एजंट किंवा मायक्रो एटीएमवर जा. ही सुविधा ग्रामीण भागात, बँकेत किंवा मोबाइल बँकिंग सर्व्हिसमध्ये मिळते.

२. मायक्रो एटीएमवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाका.

३. त्यानंतर फिंगरप्रिंट स्कॅनरच्या मदतीने बायोमॅट्रिक वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करुन घ्या. त्यानंतर आधार कार्ड आणि तुमची माहिती सारखी असणे गरजेचे आहे.

४.यानंतर तुम्हाला सिस्टीमवर अनेक ऑप्शन दिसतील. त्यातील Cash Withdrawal हा पर्याय सिलेक्ट करा.

५. यानंतर तुम्हाला जेवढी कॅश काढायची आहे तेवढी अमाउंट टाका. त्यानंतर लिंक्ड अकाउंटमधून पैसे डेबिट होतील.

६. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर बँकिंग एजंट तुम्हाला तुमचे पैसे देईल. तसेच तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर याबाबत मेसेज येईल.

पैसे काढताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

तुम्ही तुमचा आधार नंबर फक्त अधिकृत बँकिंग सर्व्हिसेजला सांगा.

त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर नेहमी तुमच्यासोबत ठेवा. जेणेकरुन तुम्हाला ट्रान्झॅक्शन झाल्यावर लगेच मेसेज येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT