How To Get Toll Pass  
बिझनेस

No Toll Tax: एक नंबर! आता २० किलोमीटरपर्यंत फ्री चालवा कार! एक रुपयाचाही नाही लागणार टोल

No Toll On Tax: नवीन एका संशोधनानुसार, राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना सोडून कोणत्याच वाहनांना राष्ट्रीय राजमार्ग, स्थायी पूल, बायपास किंवा सुरुंगच्या आधी २० किलोमीटरच्या प्रवासासाठी कोणतेच शुल्क लागणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाहनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. वाहनधारकांना आता विना टोल भरता प्रवास करता येणार आहे.रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय राजमार्ग शुल्क नियमांत एक महत्त्वपूर्ण बदल केलाय. या नियमांना राष्ट्रीय राजमार्ग शुल्क संशोधन नियम २०२४ म्हटलं जात आहे.

या नियमांनुसार, राष्ट्रीय राजमार्गांवर आधी २० किलोमीटर प्रवासासाठी शुन्य शुल्क निती लागू करण्यात आलीय. म्हणजेच काय तर तुम्हाला २० किलोमीटरच्या प्रवासासाठी कोणत्याच प्रकारचा टोल भरावा लागणार नाहीये. हे नियम फक्त त्याच वाहनांना लागू असणार आहे जे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट स्टिस्टीम ऑन बोर्ड युनिट असणाऱ्यासाठी असणार आहे.

तर नवीन संशोधनानुसार, राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहने सोडून इतर वाहनांसाठी राष्ट्रीय राज्यमार्ग ,पूल, बायपास, किंवा सुंरुगावर आधीच्या २० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणताच प्रकारचा टोल लागणार नाहीये.

जर समजा कोणत्या दिवशी २० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास झाला असेल तर वाहन चालकांना फक्त २ किलोमीटरच्या पुढील प्रवासासाठीच टोला घेतला जाणार आहे. तर नियम बदलामुळे कमी अंतराचा प्रवा करणाऱ्या वाहनधारकांचा आर्थिक बोझ कमी होणार आहे. जेणेकरून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी योग्य शुल्क रचना तयार करण्यात येईल.

मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, “ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आधारित वापरकर्ता शुल्क संकलन प्रणाली अंतर्गत, ड्रायव्हर, मालक किंवा मोटर वाहनाचा प्रभारी व्यक्ती जो राष्ट्रीय परमिट वाहनाव्यतिरिक्त तो फक्त त्याच विभागाचा वापर करत असेल. त्याला प्रत्येक दिशेत २० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यावर शुन्य -शुल्क घेतलं जाणार आहे. म्हणजेच २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणार असेल तर सुरुवातीचे २० किलोमीरटर अंतर सोडून शुल्क आकारले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT