Toll Plaza: वाहनधारकांसाठी मोठी बातमी ! 'खेड-शिवापुर' टोलनाक्यावर अडीच टक्क्यांनी टोल वाढणार

Toll Price Hike: वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. खेड-शिवापुर टोलनाक्यावर टोल वसुली वाढणार आहे.
Toll Plaza
Toll PlazaSaam Tv
Published On

सचिन जाधव साम टीव्ही, पुणे

Toll Price Hike On Khed Shivapur Tollbooth

वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. खेड-शिवापुर टोलनाक्यावर ( Khed Shivapur Tollbooth) टोल वसुली वाढणार आहे. पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिलपासुन सुमारे अडीच टक्क्यांनी टोल वसुली वाढणार आहे. याबाबत ठेकदार टोल रोड प्रशासनामार्फत पत्रक प्रसिध्द करण्यात आल आहे, अशी माहिती विभागीय प्रमुख यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

या वाढणाऱ्या टोल वसुलीमध्ये कार जीप व हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार आहे. मागील वर्षी घेण्यात येणारा 115 रुपये दर आता 120 रूपये (Toll Price Hike On Khed Shivapur Tollbooth) होणार आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होत आहे. या वाहनांना 185 रूपयांऐवजी 190 रुपये द्यावे लागणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवजड वाहनांच्या दरात वाढ

बस, ट्रक साठी दहा रुपयांची वाढ होणार आहे.या वाहनांना आता 400 रुपये टोल द्यावा लागणार आहे. तर जड वाहनांसाठी 415 रुपयांवरुन पाच रुपये वाढुन 420 रुपये होणार आहे. याबरोबरच अवजड वाहनांसाठीच्या 615 रुपये टोलमध्ये 15 रुपयांची वाढ (Pune-Satara Highway) होणार आहे. अवजड वाहनांना आता 630 रुपये टोल द्यावा लागणार आहे.

दरवर्षी टोलचे दर टोल रोड प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार वाढत असतात. यावर्षी 1 एप्रिल 2024 पासुन टोल वाढ होत असल्याची माहीती टोल रोडच्या विभागीय प्रमुखांनी दिली (Toll Price Hike) आहे. प्रवाशांनी या टोल वाढीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

Toll Plaza
Toll Plaza Worker Strike : समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल प्लाझावरील कामगारांचे कामबंद; तीन महिन्यांपासून वेतन नाही

स्थानिकांच्या मासिकपासमध्ये वाढ

या टोलच्या दरवाढीमुळे स्थानिकांच्या मासिक पासमध्ये दहा रूपयांची वाढ होणार आहे. त्यांचा मासिक पास 1 एप्रिलपासुन 340 रुपये होणार आहे. सर्वच स्थानिक वाहन चालकांकडुन टोल वसुली (Toll Plaza) करण्यात येणार आहे. यासाठी वरीष्ठ व्यवस्थापन प्रयत्नशिल आहे. स्थानिकांनी सहकार्य करावं असं, प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Toll Plaza
Toll Plaza : फास्टटॅग व्यतिरिक्त अतिरिक्त पैशांची मागणी; बीड जिल्ह्यातील वैद्यकीन्ही टोल नाक्यावरील प्रकार, वाहनधारक व कर्मचाऱ्यात वाद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com