Rule Change From Today Saam Tv
बिझनेस

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

New Rules From 1st April 2026: १ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून अनेक नियमात बदल झाले आहेत. यामध्ये शेअर मार्केटपासून ते बँकेच्या नियमांचा समावेश आहे.

Siddhi Hande

आजपासून पैशांसंबंधित अनेक नियमात बदल

शेअर मार्केट ते बँकेचे नियम बदलले

थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

१ एप्रिल म्हणजे आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. नवीन आर्थिक वर्षात अनेक नियमात बदल केले गेले आहेत. यामध्ये नवीन कामगार कायदा आणि आयकर कायद्याचा समावेश आहे. यामुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. वाचा एप्रिलपासून नक्की काय काय बदलणार?

शेअर बायबॅकवर टॅक्स नियम

१ एप्रिलपासून शेअर बायबॅकवर टॅक्स लावण्याची पद्धत बदलणार आहे. आता बायबॅकपासून होणारी कमाई डिविडेंड इन्कमऐवजी कॅपिटल गेन्स मानली जाणार आहे. कंपन्यांना २२ टक्के दर टॅक्स द्यावा लागणार आहे. याचसोबत HUF साठी ३० टक्के दर केला आहे.

F&O ट्रेडिंग महागणार

१ एप्रिलपासून F&O ट्रेडिंग महागणार आहे. भविष्यातील कंत्राटवर STT 0.02% टक्क्यांवरुन 0.05% केला आहे. ऑप्शन्ससाठी हा दर ०.१५ टक्के केला आहे. या क्षेत्रात होणारा गैरव्यव्हार कमी व्हावा यासाठी हा टॅक्स वाढवला आहे.

बँकेचे नियम (Bank Rules Change)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक नियमांमध्ये बदल केले आहे. भारतात आता सर्व डिजिटल पेमेंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन गरजेचे आहे. RuPay Platinum डेबिट कार्ड खरेदी करणाऱ्यांना १वर्षासाठी एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन लाउंजचा वापर मोफत करता येणार आहे. एचडीएफसी आणि पंजाब नॅशनल बँकेने एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमात बदल केले आहेत.

NPSच्या नियमात बदल

आता नॅशनल पेमेंट सिस्टीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PFRDA ने फीमध्ये बदल केला आहे. NAVमध्येही मोठा बदल केला आहे. आता प्रायव्हेट आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NAV वेगवेगळे असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीच्या वसमत रोडवर धावत्या ऑटोला आग, काही क्षणात वाहन जळून खाक

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Electricity Bill Mumbai: विज बील होणार स्वस्त, ग्राहकांसाठी नवे दर काय असतील?

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT