December 2026 Rules saam tv
बिझनेस

New Rules December 2026: १ डिसेंबरपासून खिशाला बसणार फटका? SBI कार्डपासून गॅस सिलिंडरपर्यंत ७ मोठे बदल

December 2026 Rules: १ डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्ड, गॅस सिलिंडरचे दर, आधार अपडेट, RBI रेपो रेट आणि बँकांच्या व्याजदरांमध्ये संभाव्य बदल होणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

डिसेंबर महिना सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. १ डिसेंबर २०२६ पासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे आर्थिक बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये SBI क्रेडिट कार्डचे नियम, LPG सिलिंडरचे दर, आधार अपडेट, कमोडिटी ट्रेडिंग आणि बँकांच्या व्याजदरांचा समावेश आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरूवातीलाच या बदलांची माहिती असणं आवश्यक आहे. जाणून घेऊया महत्त्वाचे ७ बदल.

1. SBI क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल

1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डच्या काही व्यवहारांवर जास्त शुल्क लागू होणार असल्याचं दिलेल्या माहितीत नमूद केलं आहे. एका व्यवहारात 30 हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सपोर्ट पेमेंट केल्यास 1 टक्के शुल्क आणि लागू कर आकारला जाऊ शकतो.

2. RBI च्या बैठकीकडे लक्ष

रिझर्व्ह बँकेची MPC बैठक 2 ते 4 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या बैठकीत रेपो रेटबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. व्याजदर बदलल्यावर गृहकर्ज, कार लोन आणि FD च्या व्याजदरांवर परिणाम होऊ शकतो.

3. कमोडिटी ट्रेडिंगचे नवे नियम

SEBI कडून 1 डिसेंबरपासून कमोडिटी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी नवीन मार्जिन नियम लागू होणार असल्याची माहिती आहे. यानुसार ट्रेडर्सना जोखमीच्या आधारावर 6, 8 किंवा 10 टक्के प्रारंभिक मार्जिन ठेवावे लागू शकते.

4. आधार ईमेल अपडेट मोफत

आधार कार्डमध्ये ईमेल आयडी जोडण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आकारले जाणारे 75 रुपयांचे शुल्क 31 डिसेंबरपर्यंत माफ असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ही सुविधा अधिकृत Aadhaar मोबाइल ॲपमधूनच उपलब्ध असेल.

5. NRI साठी डिजिटल KYC सुविधा

NRI आणि OCI कार्डधारकांना आता डिजिटल KYC करता येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना KYC प्रक्रियेसाठी भारतात येण्याची गरज भासणार नाही.

6. LPG सिलिंडरच्या किमती बदलणार?

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे 1 डिसेंबरला घरगुती 14.2 किलो आणि व्यावसायिक 19 किलो सिलिंडरचे नवे दर जाहीर होऊ शकतात.

7. गृहकर्ज आणि FD वर परिणाम

RBI च्या रेपो रेट निर्णयानुसार बँका गृहकर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरांचा आढावा घेऊ शकतात. त्याचबरोबर FD वरील व्याजदरांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 राज्यात जोरदार पाऊस, ८० किमी वेगाने वादळी वारे अन् दाट धुकं; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

Maharashtra News Live Update: ४५१ अन्नपदार्थांचा नैवेद्य आणि हजारोंच्या दिव्यांनी उजळले श्रीमंत दगडूशेठ मंदिर

Coconut Oil vs Moisturizer: नारळाचं तेल की मॉइश्चरायझर? थंडीत चेहऱ्याला काय लावणं फायदेशीर? जाणून घ्या योग्य पर्याय

SBI मशीनमध्येच बनावट नोटांचा भरणा! ५०० रुपयांच्या ४७ नोटा पाहून बँकेलाही धक्का

Kitchen Tips : सुंदर क्रॉकरीच्या नादात करू नका ही चूक; खरेदीपूर्वी जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT