New Rules Saam Tv
बिझनेस

New Rules: बँक खाते ते पेन्शन, १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवे नियम; तुमच्या खिशावर होणार परिणाम

Financial Rule Change From 1st November 2025: नोव्हेंबर महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये बँक खाते नॉमिनीपासून ते पेन्शनचा समावेश आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी

१ नोव्हेंबरपासून पैशासंबंधित हे नियम बदलणार

SBI क्रेडिट कार्डपासून ते बँक खात्याच्या नियमात बदल

नोव्हेंबर महिना सुरु होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार आहे. या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिक, कर्मचारी, पेन्शनधारकांवर परिणाम होणार आहे. यामध्ये स्टेट बँक क्रेडिट कार्डपासून ते पेन्शनच्या नियमात बदल होणार आहे. उद्यापासून नक्की कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या.

१. बँक खात्यातील नॉमिनीचा नियम (Bank Nominee Rule)

१ नोव्हेंबरपासून बँक खातेधारकांना दिलासा मिळणार आहे. आता तुम्ही एका खात्याला ४ नॉमिनी जोडू शकतात. याआधी फक्त १ नॉमिनी जोडण्याची अट होती. आता तुम्हाला चार नॉमिनी जोडता येणार आहे.यामध्ये क्रमवारीनुसार प्रोसेस होणार आहे. सर्वात आधी पहिल्या नॉमिनीला प्राधान्य दिले जाणार आहे.

२. स्टेट बँक क्रेडिट कार्ड (SBI Credit Card Rule)

स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमातही बदल करण्यात आले आहे. आता तुम्ही जर शाळा, कॉलेजची फी भरण्यासाठी थर्ड पार्टी अॅपचा वापर करत असाल तर तुम्हाला १ टक्के शुल्क भरावे लागणार आहे. तुम्ही जर शाळा किंवा कॉलेजच्या वेबसाइट किंवा POS मशीनद्वारे पेमेंट केले तर कोणतेही शुल्क लागणार आहे.

३. युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS Scheme)

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीममध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख वाढवून दिली आहे. आता तुम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतात. याआधी ३० सप्टेंबर शेवटची तारीख होतील.

४.पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागेल. हे प्रमाणपत्र ऑनलाइन किंवा बँक किंवा पोस्टात जमा करु शकतात. यामुळे तुम्हाला पेन्शन येण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT