पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत नागरिकांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमांमुळे पेन्शन काढणे सोपे होणार आहे. पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन पेन्शनचे पैसे काढू शकतात. ईपीएफओने या नवीन सर्व्हिससाठी सेंट्रलाइज्ड पेंशन पेमेंट सिस्टीमला मंजुरी दिली आहे. (Pension Rule)
सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीमने कोणत्याही बँकेच्या ब्रँचमधून पेन्शन काढण्यासाठी मंजुरी दिली आहे. याचा फायदा ७८ लाखपेक्षा जास्त पेन्शनधारकांना होणार आहे. जे लोक सेवानिवृत्त झाले आहेत आणि आपापल्या गावी गेले आहेत. त्यांना याआधी फक्त ज्या बँकेत अकाउंट आहे त्याच बँकेच्या ब्रँचमधून पैसे काढू शकत होते. मात्र, आता तुम्ही कोणत्याही बँकेच्या कोणत्याही ब्रँचमधून पैसे काढू शकता. (Pension Rule For Withdraw Money)
ही नवीन सर्व्हिस लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांना बँक किंवा ब्रँच बदलण्याची गरज पडणार नाही. यामुळे पेन्शन पेमेंट आदेश ट्रान्सफर करण्याची आवश्यकता भासणार नाही. हा नवीन नियम कालपासून लागू झाला आहे.
EPS मध्ये योगदान
प्रत्येक कर्मचारी पेन्शनसाठी दर महिन्याला EPS अकाउंटमध्ये पैसे जमा करतात. या योजनेत १२ टक्के रक्कम EPS मध्ये जमा केली जाते. तर कंपनीदेखील तेवढेच योगदान देते. यातील ८.३३ टक्के योगदान EPS तर ३.६७ टक्के योजदान EPF मध्ये जमा केले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.