घरगुती LPG ग्राहकांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. सब्सिडीच्या लागू दरात LPG रिफिल मिळवण्यासाठी Biometric Aadhaar Authentication (BAA) पूर्ण असणं आवश्यक आहे. केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
सरकारच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत २७.४३ कोटी म्हणजेच ८९.९ टक्के सक्रिय घरगुती LPG ग्राहकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. ज्यांचे प्रमाणीकरण (Authentication) आधीच झालं आहे, त्यांना पुन्हा कोणतीही प्रोसेस करण्याची गरज नाही.
BAA पूर्ण न केलेल्या ग्राहकांना LPG सिलिंडर मिळणं बंद होणार नाही. मात्र, त्यांना सब्सिडीशिवाय लागू बाजारभावाने सिलिंडर घ्यावा लागू शकतो. उपलब्धतेनुसार ५ किलो किंवा १० किलोचे सिलिंडर देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत.
सिलिंडर डिलिव्हरीच्या वेळी: डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या डिव्हाइसवरून प्रमाणीकरण करता येईल.
गॅस एजन्सी: संबंधित वितरकाच्या शोरूममध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
मोबाइल ॲप: संबंधित तेल कंपनीच्या अधिकृत ॲपवरून घरबसल्या प्रक्रिया करता येते.
Indane साठी IndianOil ONE, Bharatgas साठी HelloBPCL आणि HP Gas साठी HP PAY ॲपचा वापर करता येतो. सरकारच्या माहितीनुसार, ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी BAA पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मदतीसाठी LPG हेल्पलाइन 1800 2333 555 उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.