gas cylinder rules  Saam tv
बिझनेस

मोठी बातमी! सिलिंडरचे बुकिंग ते डिलिव्हरीपर्यंत नियम बदलणार, किंमतीही वाढण्याची शक्यता

gas cylinder rules : सिलिंडरचे बुकिंग ते डिलिव्हरीपर्यंत नियम बदलणार आहेत. एक मेपासूनच या नियमात बदल होणार आहेत.

Vishal Gangurde

गॅस सिलिंडरच्या बुकिंगच्या नियमात बदल होणार

मे महिन्यापासून लागू होणार नवीन नियम

गॅस सिलिंडरचे भाव वाढण्याची शक्यता

गॅस सिलिंडरच्या नियमाबाबत महत्वाची बातमी हाती आली आहे. देशात मे महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या नियमांत पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बुकिंग ते डिलिव्हरीपर्यंतच्या नियमात बदल होणार आहेत. विशेष म्हणजे आता ग्राहकांना सिलिंडरसाठी नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी डिलिव्हरी एजंटला देणे बंधनकारक असणार आहे.

गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरी पद्धतीत सुधारणा आणण्यासाठी सरकारने नवं पाऊल उचललं आहे. एलपीजी सिलिंडरबाबतचे सर्व नियम १ मे पासून लागू होणार आहेत. जाणून घ्या नवीन नियम

बुकिंगच्या नियमात बदल

गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. शहरी भागातील ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर गॅस सिलिंडरसाठी २५ दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर ग्रामीण भागात ४५ दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना गॅस सिलिंडरचा वापर काळजीपूर्वक करावा लागणार आहे.

ओटीपी आधारित डिलिव्हरी

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ओटीपी आधारित असणार आहे. ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी डिलिव्हरी एजंटला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरची डिलिव्हरी योग्य व्यक्तीकडे होईल.

ई-केवायसी अनिवार्य

गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे आधार ई-केवायसी केल्यानंतरच तुम्हाला एलपीजी सुविधा आणि सबसिडी मिळणार आहे. तुम्ही ई-केवायसी केली नाही, तर तुम्हाला गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

गॅस सिलिंडरचे भाव वाढणार

मे महिन्यापासून गॅस सिलिंडरचे भाव वाढण्याची शक्यता आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. इराण-अमेरिकेत तणाव आणखी वाढल्याने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पीएनजी गॅस वापरण्याचे आवाहन

एलपीजी गॅस सिलिंडरऐवजी पीएनजी गॅस वापरण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. पीएनजी कनेक्शन घेतल्यास ५०० रुपयांच्या मोफत गॅसची ऑफर देखील देण्यात येत आहे.

बुकिंगची पद्धत झाली आणखी सोपी

गॅस सिलिंडर बुकिंग करण्याची पद्धत आणखी सोपी करण्यात आली आहे. आता गॅस सिलिंडर वेगवेगळ्या पद्धतीने बुकिंग करू शकता. व्हाट्सअॅप, एसएमएस, मिस्ड कॉल, आयव्हीआरएस किंवा मोबाइल अॅप्स, वेबसाइटद्वारे गॅस सिलिंडर बुकिंग करू शकता. परंतु गॅस सिलिंडर बुकिंग ही नोंदणीकृत मोबाईल नंबरने करणे अनिवार्य असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची तात्काळ मदत

Fuel Price Hike : देशात विमान सेवा बंद होणार? एअरलाईन्स अडचणीत, एअर इंडियाचे थेट सरकारला पत्र; जाणून घ्या कारण

Abhishek Bachchan : अभिषेकने खोटी अंगठी घालून केलं होत ऐश्वर्या रायला प्रपोज, बच्चन कुटुंबाच्या लेकावर 'अशी' वेळ का आली?

IPL मध्ये नवा वाद! राजस्थानचा कर्णधार सामना सुरू असताना ओढतोय सिगारेट; व्हिडिओने खळबळ

SCROLL FOR NEXT