New Labour Law Saam tv
बिझनेस

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

New Labour Law Salary Rule Change: १ एप्रिलपासून नवीन कामगार संहिता लागू होणार आहे. यानुसार तुमच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे. तुमची टेक होम सॅलरीची रक्कम कमी होऊ शकते.

Siddhi Hande

१ एप्रिलपासून नवीन कामगार संहिता लागू

तुमच्या पगारावर होणार परिणाम

टेक होम सॅलरी कमी होणार?

१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. १ एप्रिलपासून अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. नवीन कामगार संहिता लागू होणार आहे. यामुळे तुमच्या थेट पगारावर परिणाम होणार आहे. तुमची टेक होम सॅलरी कमी होई शकते. १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा आणि नवीन कामगार संहिता लागू होणार आहे. यामुळे तुमच्या थेट खिशावर परिणाम होणार आहे. तुमचा पीएफ, एचआरए, ग्रॅच्युटी आणि स्पेशल अलाउंसमध्ये बदल होणार आहे.

१ एप्रिलपासून सॅलरीत बदल (Salary Change From 1st April)

१ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार आहे. ४ नवीन नियम लागू होणार असल्याने सॅलरीच्या कॅल्क्युलेशनमध्ये बदल होणार आहे. याचा परिणाम फक्त प्रायव्हेट कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

१ एप्रिलपासून इन्कम टॅक्स, कामाचा कालावधी, फुल अँड फायनल सेटलमेंट, बोनससाठी नवीन नियम लागू होणार आहे. या नियमांमुळे तुम्हाला कदाचित नुकसान झाले असे वाटेल मात्र भविष्यात या नियमाचा फायदाच होणार आहे. यामुळे सॅलरी स्लिपवर अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.

काय आहे नवीन कामगार संहिता?

सरकारने नवीन कामगार संहिता लागू केली आहे. २९ कामगार कायदे विलीन करुन ४ कामगार संहिता तयार केल्या आहेत. यामध्ये तन संहिता (२०१९), औद्योगिक संबंध संहिता (२०२०), सामाजिक सुरक्षा संहिता (२०२०) आणि OSHWC संहिता (२०२०) यांचा समावेश आहे.

पगारावर काय होणार परिणाम?

आता नवीन कामगार संहितेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर परिणाम होणार आहे. आता मूळ पगार हा एकूण वेतनाच्या म्हणजे सीटीसीच्या किमान ५० टक्के ठेवणे अनिवार्य असणार आहे. आतापर्यंत कंपन्या मूळ वेतन कमी करुन घरभाडे भत्ता, विशेष भत्ता वाढवत होते.परंतु आता सीटीसीच्या अर्धा मूळ पगार ठेवावा लागणार आहे.

हातात येणारा पगार कमी होईल का?

मूळ पगारात वाढ झाल्याने तुमच्या टेक होम सॅलरीवर परिणाम होणार आहे. तुमच्या पीएफ आणि ग्रॅच्युटीचं कॅल्क्युलेशन मूळ पगारावर केले जाते. म्हणजेच तुमचा मूळ पगार वाढला की पीएफ आणि ग्रॅच्युटीत वाढ होईल.याचसोबत पगारातून येणारही कपात वाढणार आहे. तुमच्या हातात येणारा पगार कमी होऊ शकतो. १ एप्रिलपासून हा बदल होऊ शकतो.

नवीन कर रचनेचा फायदा

नवीन कर रचनेमुळे पीएफमधील कपात जास्त होईल. सेवानिवृत्तीच्या वेळी निधी अधिक जास्त येईल. ग्रॅच्युटीमधील वाढीमुळे भविष्यात तुम्हाला जास्त रक्कम मिळेल. तुमचा सध्या हातात येणारा पगार कमी होऊ शकतो. मात्र, भविष्यात हे फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT