Gratuity Rules Saam Tv
बिझनेस

New Labour Code: नवीन कामगार कायद्यात महत्त्वाचा बदल; ग्रॅच्युटी वाढणार पण कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका

New Labour Law Gratuity Rules: नवीन कामगार कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार ग्रॅच्युटीच्या नियमातही बदल झाले आहे. तुम्हाला आधीपेक्षा जास्त ग्रॅच्युटी मिळू शकते. परंतु त्याचसोबत करदेखील भरावा लागू शकतो.

Siddhi Hande

नवीन कामगार कायदा लागू

ग्रॅच्युटीच्या नियमात बदल

ग्रॅच्युटीत होणार वाढ पण करदेखील भरावा लागणार

१ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. या नवीन कामगार कायद्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. हे नवीन नियम खूप सोपे आहेत. यामध्ये सॅलरी स्ट्रक्चर, पीएफ आणि सामाजिक सुरक्षेबाबतचे नियम सोपे केले आहेत. यामध्ये ग्रॅच्युटीच्या नियमातदेखील बदल केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

नवीन कामगार कायद्यात ग्रॅच्युटीचेही नियम बदलले आहेत.या नवीन नियमांमुळे ग्रॅच्युटीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना करदेखील भरावा लाग शकतो. दरम्यान, कर्मचाऱ्यांना का कर भरावा लागू शकतो ते जाणून घया.

याआधी ग्रॅच्युटी फक्त मूळ वेतन आणि महागाई भत्त्यावर अवलंबून असायची. परंतु आता ग्रॅच्युटी मूळ वेतन, महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांच्या आधारावर मोजली जाते. यामुळेच तुमचा मूळ पगार वाढेल, ग्रॅच्युटीसुद्धा वाढणार आहे. दरम्यान, मूळ वेतन आणि महागाई भत्ता या जुन्या आधारावर कर सवलत आहे. यामुळे तुम्हाला ग्रॅच्युटी मिळेल, परंतु करदेखील भरावा लागू शकतो.

जुन्या पद्धतीनुसार, १० लाख रुपये आणि नवीन पद्धतीनुसार १५ लाख ग्रॅच्युटी मिळाली तर १० लाखांची ग्रॅच्युटी करमुक्त मानली जाते. परंतु १५ लाखांच्या ग्रॅच्युटीवर ५ लाखांवर कर भरावा लागू शकतो.

या नवीन बदलामुळे ग्रॅच्युटीच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. मूळ वेतन हे सीटीसीच्या अर्धे असणार आहे. त्यामुळे ज्यांच्या पगारात सर्वाधिक रक्कम भत्त्यातून मिळते. त्यांच्या ग्रॅच्युटीत वाढ होण्याची शक्यता आहे.हा बदल करण्यासाठी कर नियमांमध्ये अजून कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT