New Labour Code Saam Tv
बिझनेस

New Labour Code: ४ दिवस काम, ३ दिवस सुट्ट्या; नवीन कामगार कायद्याचा कोणाला होणार फायदा? वाचा सविस्तर

New Labour Law: नवीन कामगार कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आता कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४८ तास काम करायचे आहे. दरम्यान, यामध्ये तुम्ही ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी घेऊ शकता. मात्र, हा नियम फक्त काही क्षेत्रांसाठीच लागू होऊ शकतो.

Siddhi Hande

नवीन कामगार कायदा लागू

४ दिवस काम, ३ दिवस सुट्टी नियम लागू होणार

या क्षेत्रांना फायदा होण्याची शक्यता

सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे. या नवीन नियमांनुसार आता महत्त्वाचे बदल केले जाणार आहे. नवीन नियमानुसार आठवड्याला चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन कामगार कायद्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याचा आठवड्याचा कामाचा वेळ ४८ तासांपेक्षा जास्त नसणार आहे. याचाच अर्थ असा की, कंपनी आणि कर्मचारी ४८ तास कितीही दिवसात करु शकतात. दर दिवशी १२ तास काम करुन आठवड्याला तीन दिवस सुट्टी घेऊ शकतात.

नवीन कामगार कायद्यात हा नियम सर्वांसाठी लागू नाहीये.रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी कामाचा कालावधी ८ तासांचाचा असतो. त्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जातो. त्यांना ओव्हरटाईमसाठी डबल पैसे मिळतात.

नवीन कामगार कायदे कामगारांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. लवचिकता आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठे पाऊल आहे. सध्या जरी फक्त काही कामांमध्ये चार दिवसांचा आठवडा असला तरीही भविष्यात भारतासाठी महत्त्वाचा बदल ठरु शकतो.

कोणत्या क्षेत्रांमध्ये हा नियम लागू होऊ शकतो?

मिडिया रिपोर्टनुसार, प्रोडक्शन, पायाभूत सुविधा, आयटी, शेअर्ड सर्व्हिस यामध्ये अंबलबजावणी केली जाऊ शकते. या ठिकाणी शिफ्टवर आधारित कामे होतात. त्या ठिकाणी हा कायदा लागू होऊ शकतो. खाजगी कंपन्या त्यांच्यानुसार या नियमांची अंबलबजावणी करु शकतात. ज्या क्षेत्रांमध्ये तात्काळ गरजा असतात आणि त्यांना रिअल टाइम डिलिव्हरीची अपेक्षा असते तिथे हा नियम लागू करणे थोडे आव्हानात्मक असू शकते. त्यामुळे भविष्यात काही क्षेत्रांमध्ये हा नियम लागू होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये पावसाची हजेरी

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

SCROLL FOR NEXT