Salary Saam Tv
बिझनेस

New Labour Code : ₹60 हजार CTC असणाऱ्यांना किती मिळणार In-Hand Salary? समजून घ्या Calculation

what is new labour code India : नवीन कामगार कायद्यानुसार ₹६०,००० सीटीसी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या इन-हँड पगारात घट होणार असली तरी पीएफ आणि ग्रॅच्युटीमध्ये वाढ होणार आहे. जुन्या आणि नव्या सॅलरी स्ट्रक्चरमधील फरक आणि संपूर्ण गणित येथे समजून घ्या.

Namdeo Kumbhar

नव्या आर्थिक वर्षांपासून देशभरात नवीन कामगार कायदा (New Labour Code) लागू झालाय. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगाराच्या स्ट्रक्चरमध्ये (Salary Structure) मोठा बदल होणार आहे. ६० हजार अथवा त्यापेक्षा जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल. इन हँड सॅलरी, पीएफ आणि ग्रॅच्युटीचं गणित बदलणार आहे. एकीकडे हातात येणारा पगार कमी होऊ शकतो, पण दुसरीकडे रिटायरमेंट फंड, पीएफ आणि ग्रॅच्युटीमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसतेय. नव्या कामगार कायद्यामुळे ६० हजारांचा सीटीसी असणाऱ्या कर्मचाऱ्यावर काय परिणाम होणार, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

आतापर्यंत कंपन्या आपल्या मर्जीने सॅलरी स्ट्रक्चर तयार करत होती. त्यामध्ये बेसिक पगार नेहमीच खूप कमी असायचा. जेणेकरून कंपनीला पीएफ आणि ग्रॅट्युटीसाठी कमी पैसे मोजावे लागावेत. पण आता नव्या कामगार कायदामुळे मोठा बदल झाला आहे. कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून नवीन कामगार कायदा आणलाय. त्यामध्ये कर्मचाऱ्याचा बेसिक पगार त्याच्या सीटीसीच्या ५० टक्के इतका ठेवावा लागणार आहे. आता याचा थेट परिणाम त्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे, ज्याच्या पगारात भत्ते म्हणजेच स्पेशल अलाऊन्स जास्त प्रमाणात आहेत. पाहूयात ६० हजार पगार असणाऱ्यांवर काय परिणाम होणार..

पगाराचे जुनं स्ट्रक्चर -

आधी कंपन्यांकडून स्मार्ट पद्धतीने सॅलरी ब्रेकअप तयार केले जात होते. ६० हजार सीटीसी असेल तर बेसिक सॅलरी २० हजार ठेवली जात होती. यामुळे पीएफसाठी कंपनीला कमी पैसे मोजावे लागत होते. त्याशिवाय कर्मचाऱ्यालाही टेक होम सॅलरी जास्त येत होती.

  • एकूण पगार (CTC) - ६०,०००

  • बेसिक पगार (मूलभूत वेतन) - २०,०००

  • पीएफ- कर्मचारी (मूलभूत 12%) - २,४००

  • पीएफ- नियोक्ता योगदान (मूलभूत च्या 12%) - २,४००

  • ग्रेच्युटी (अनुमानित मंथली डिक्शन) - ९६२

  • स्पेशलाउ भत्ते - ३४,२३८

  • इन-हँड सॅलरी (मूलभूत + विशेष भत्ता) ५४,२३८

नव्या कामगार कायद्यामुळे काय झालं?

नव्या कामगार कायद्यामुळे आता पगाराच्या स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल होणार आहे. कारण, नियमांनुसार आता कंपनीला तुमच्या सीटीसीच्या ५० टक्के बेसिक सॅलरी ठेवावीच लागणार आहे. म्हणजे, ६० हजार सीटीसी असेल तर तुमची बेसिक सॅलरी कमीत कमी ३० हजार रूपये ठेवावीच लागणार आहे. तुमचा मूळ पगार २० हजारांवरून ३० हजार झाल्यानंतर पीएफ आणि ग्रॅच्युटीचं कॅलकुलेशन बदलणार आहे.

  • एकूण पगार (CTC) ६०,०००

  • बेसिक सॅलरी (CTC च्या 50%) ३०,०००

  • पीएफ- कर्मचारी (मूलभूत 12%) ३,६००

  • पीएफ- नियोक्ता योगदान (मूलभूत च्या 12%) ३,६००

  • ग्रेच्युटी ( मंथली डिक्शन) १,४४३

  • स्पेशलाउ अलंस (बाकी बची राशि) - २१,३५७

  • इन-हँड सॅलरी (मूलभूत + विशेष भत्ता) ५१,३५७

₹६०,००० पगार (CTC) असलेल्या कर्मचाऱ्याच्या हातात येणाऱ्या पगारात दरमहा ₹२,८८१ ची कपात होईल. पण ही कपात म्हणजे तुमचे नुकसान नाही. हे पैसे कुठेही वाया न जाणार नाहीत. हा निधी तुमच्या पीएफ (PF) खात्यात जमा होतोय आणि तुमच्या ग्रॅच्युइटीचा भाग बनतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT