New Labour Law Salary google
बिझनेस

New Labour Law: पगारात घट होणार? नव्या नियमांचा ग्राहकांना दणका बसणार; १ मेपासून बँकेचे कोणते नियम बदलणार?

New Labour Law Salary Rules: 1 मे पासून नवीन कामगार कायदा लागू होणार आहे. त्यामध्ये ATM, पगार, म्युच्युअल फंड आणि बंकांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामध्ये अनेक नियम १ मेपासून लागू केले जातील.

Sakshi Sunil Jadhav

येत्या १ मेपासून महाराष्ट्रात नवीन कामगार संहिता लागू होणार आहे. कामगार संहितेचा कामगारांवर परिणाम होणार आहे. यात काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत. सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे तुमची बेसिक सॅलरी (CTC)च्या ५० टक्के इतकी असेल. तर तुमचा पीएफ जास्त कापला जाईल.

याने तुम्हाला भविष्यात फायदा होईल पण हातात कमी पगार येईल. तर कामाच्या ठिकाणी तुम्ही १५ मिनिटे जास्त काम केलं तरीही तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. यात ओव्हरटाइमचे डबल पैसे मिळतील. हाच नियम Zomato आणि Swiggy डिलीवरी पार्टनर्सना सुद्धा लागू होतो.

ATMमधील महत्वाचा बदल

नवीन कामगार संहितेत(New Labour Code) १ मेपासून दैनंदिन वापरातल्या ATMचे नियमही बदलले आहेत. त्यामध्ये ट्रान्झॅक्शनची मुदत कमी केली आहे. म्हणजे तुम्ही जर महिन्याच्या लिमीटपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला त्याचा चार्ज किंवा शुल्क भरावे लागेल.

म्यूचुअल फंडातले बदलेले नियम

तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला तुमचे पैसे कोणत्या कामासाठी वापरले जात आहेत? तसेच त्याच किती रिस्क असेल याची माहिती मिळेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना सेफ गुंतवणूकीचा पर्याय निवडणं सोपं होईल.

बॅंक अकाउंट बंद

जर तुम्ही १ मेच्या आधी e-kyc अपडेट केली नाही तर तुमचं खातं फ्रीज करण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला बॅंकेशी संबंधीत कोणतेच व्यवहार करता येणार नाहीत.

UPI पेमेंटमध्ये अंगठ्याचे स्कॅन महत्वाचे

तुम्हाला आता UPI पेमेंट करताना तुमच्या अंगठ्याने स्कॅन करणं महत्वाचं ठरेल. यात Two-Factor Authentication करणं आवश्यक राहील. याने फॉड होण्यापासून तुम्ही वाचू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: INDIA आघाडीच्या नेत्यांचा रामलीला मैदानाकडे मोर्चा

Dengue Awareness : उत्तम फिटनेस असलेल्या लोकांनाही डेंग्यूचा धोका का असतो? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे उपाय

Death News: हनी सिंगच्या पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू; वाढदिवसाच्या पार्टीहून परतताना काळाचा घाला

Political News: मोठी बातमी! २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT