दुचाकी उत्पादक Jawa Yezdi Motorcycles ने नुकतेच नवीन Jawa 350 लॉन्च केली आहे. ही Java Standard ची अपडेटेड एडिशन आहे. रेट्रो डिझाइन केलेल्या या बाईकमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. जावा 350 ही एक अॅडव्हेंचर बाईक आहे. ऑफ-रोड प्रवासासाठी देखील ही बाईक बेस्ट आहे. यातच ही बाईक कशी आहे, याचे फीचर्स आणि इंजिनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...
नवीन जावा 350 च्या डिझाइन बद्दल बोलायचे तर, ही डबल कार्डल फ्रेमवर बनवण्यात आली आहे. या आयकॉनिक बाईकचे सिल्हूट जुन्या मॉडेलसारखेच आहे. या बाईकला रेट्रो डिझाइन देण्यात आली आहे. असं असलं तरी ती तिच्या स्टँडर्ड मॉडेलपेक्षा बरीच वेगळी दिसते. यात एक मस्क्यूलर इंधन टाकी, सपाट सीट , गोल हेडलाइट्स, 8-इंच चाके आणि ऑल-एलईडी देण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवीन डिझाइन केलेले इंडिकेटर आणि सोलो सीट बाईकचा विंटेज लूक हायलाईट करतात. एकूणच या बाईकचा लूक खूपच छान आहे. याशिवाय Jawa 350 मध्ये इतरही अनेक महत्त्वाचे बदल दिसत आहेत. (Latest Marathi News)
बाईकमध्ये एक मोठे इंजिन देण्यात आई आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे एक पॉवरफुल इंजिन असून चांगल्या राइडसाठी डिझाइन करण्यात आले आहे. जावा 350 ला खडबडीत प्रदेशातही फिरताना कोणतीही अडचण येणार नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. याशिवाय बाईकवर बसवलेले रुंद टायर्स रस्त्यावर चांगली पकड निर्माण करतात. यासोबतच बाईकमध्ये एक छोटा रेडिएटर बसवण्यात आला आहे जो प्रवासादरम्यान तुमच्या पायांना कूलिंग सिस्टम प्रदान करतो. यामुळे रायडरला लांबचा प्रवास करणे शक्य होईल.
New Jawa 350 मध्ये तुम्हाला 334cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळेल. हे इंजिन 22bhp ची पॉवर आणि 28Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय बाईकचा विस्तारित व्हीलबेस तुम्हाला चांगला समतोल आणि आराम देतो. बाईकमध्ये स्पोक व्हीलसह हाय-प्रोफाइल टायर बसणवण्यात आले आहेत.
जावा 350 चे ग्राउंड क्लीयरन्स 178 मिमी आणि सीटची उंची 802 मिमी आहे. बाईकच्या चाके आणि सस्पेन्शन सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, जावा 350 मध्ये MRF झॅपर्स बसवले गेले आहेत. बाईकमध्ये समोर 35mm टेलिस्कोपिक फॉर्क्ससह 100/90-18 टायर सेटअप आहे. मागील बाजूस ट्विन सस्पेंशनसह 130/80-17 टायर सेटअप आहे. बाईकच्या सस्पेन्शन ट्रॅव्हलबद्दल बोलायचे झाले तर समोर 135mm मोनोशॉक युनिट आणि मागील बाजूस 100mm ट्रॅव्हल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.