Honda Activa 125  Saam Tv
बिझनेस

Honda Activa 125: होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाकडून नवीन अॅक्टिव्‍हा १२५ लाँन्च , जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Honda Activa 125: अॅक्टिव्‍हा १२५ ग्राहकांची पंसतीची स्‍कूटर राहिली आहे आणि या स्‍कूटरमधील नवीन अपग्रेड्स सोयीसुविधा व स्‍टाइल दर्जा अधिक सुधारण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

Bharat Jadhav

होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज नवीन आकर्षक रंग व प्रगत फीचर्स असलेली नवीन ओबीडी२बी-प्रमाणित अॅक्टिव्‍हा १२५ लाँन्च केली. नवीन २०२५ होंडा अॅक्टिव्‍हा १२५ ची किंमत ९४,४२२ रूपयांपासून (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) सुरू होते. आजच्‍या राइडर्सच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करत कंपनीने कमालीची स्कूटर लॉन्च केलीय. आकर्षक नवीन रंग आणि प्रगत तंत्रज्ञानासह नवीन अॅक्टिव्‍हा १२५ ‍ ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यास यशस्वी होईल.

स्कूटर लॉन्चच्या वेळी उपस्थित असलेले होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक, अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्हणाले, आम्‍हाला नवीन ओबीडी२बी-प्रमाणित अॅक्टिव्‍हा १२५ च्‍या लाँचची घोषणा करताना आनंद होतोय. लाँन्च करण्‍यात आलेल्‍या या अपडेटेड मॉडेलमधून ग्राहक समाधानाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. १२५ सीसी स्‍कूटर सेगमेंटमधील टीएफटी डिस्‍प्‍ले आणि ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी सारख्‍या प्रगत फीचर्स आमच्या ग्राहकांसाठी राइडिंग अनुभव नव्‍या उंचीवर नेईल. ही नवीन स्‍कूटर तिच्‍या विभागात बेंचमार्क स्‍थापित करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अॅक्टिव्‍हा १२५ मध्‍ये आता अनेक नवीन सुधारित फीचर्स आहेत, जी ग्राहकांचा राइडिंग अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. या अपग्रेडचे खास फीचर्स म्हणजे १२३.९२ सीसी, सिंगल-सिलिंडर पीजीएम-एफआय इंजिन, जे आता ओबीडी२बी प्रमाणित आहे आणि ६.२० केडब्‍ल्‍यू शक्‍ती व १०.५ एनएम टॉर्कची निर्मिती करते. तसेच या स्‍कूटरमध्‍ये प्रगत इडलिंग स्‍टॉप सिस्‍टम देखील आहे, जी होंडाच्‍या शाश्‍वत तत्त्वाशी संलग्‍न राहत इंधन कार्यक्षमता वाढवते.

अॅक्टिव्‍हा १२५ मध्‍ये नवीन ४.२-इंच टीएफटी डिस्‍प्‍लेसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आहे. तसेच स्‍कूटरमध्‍ये होंडा रोडसिंक अॅप आहे, जे नेव्हिगेशन व कॉल/मॅसेज अलर्ट्स सारखे फंक्‍शन्‍स देते, ज्‍यामुळे राइडर्सना स्‍कूटर राइडिंग करताना देखील कनेक्‍टेड राहता येते. अॅक्टिव्‍हा १२५ मध्‍ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे, ज्‍यामुळे राइडर्सना स्‍कूटर राइडिंग करताना डिवाईसेस चार्ज करता येतात.

ब्रँडवर लाखो ग्राहकांच्‍या असलेल्‍या विश्‍वासाप्रती बांधील राहत अॅक्टिव्‍हा १२५ मध्‍ये प्रतिष्ठित सिल्‍हूट कायम ठेवण्‍यात आले आहे, पण विरोधाभासी ब्राऊन-रंगाच्‍या सीट्स व अंतर्गत पॅनेल्‍स आहे, ज्‍यामुळे स्‍कूटरची व्हिज्‍युअल आकर्षकता अधिक वाढली आहे. ही स्‍कूटर दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येईल, डीएलएक्‍स आणि स्‍मार्ट, तसेच सहा रंगांचे पर्याय देखील आहेत. हे रंग आहेत - पर्ल इग्निअस ब्‍लॅक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटलिक, पर्ल डीप ग्राऊंड ग्रे, पर्ल सिरेन ब्‍ल्यू, रिबेल रेड मेटलिक आणि पर्ल प्रीशियस व्‍हाइट.

नवीन २०२५ होंडा अॅक्टिव्‍हा १२५ ची किंमत ९४,४२२ रूपयांपासून, (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) सुरू होते. ही स्‍कूटर आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिपमध्‍ये उपलब्‍ध आहे. मॉडेल व्‍हेरिएण्‍ट किंमत (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) अॅक्टिव्‍हा १२ डीएलएक्‍ससाठी ९४,४२२ रूपये मोजावे लागतील. तर स्मार्ट स्कूटरसाठी ९७,१४६ रूपये खर्च करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT