Kia Syros Launch : 'किया सिरॉस' आली! कधीपासून बुकिंग, फीचर्स आणि अंदाजे किंमत किती? वाचा सविस्तर

Kia India Lunched Kia Syros: किया इंडियाने आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही किया सिरॅास 'Kia Syros' आज भारतात लॅांच केली आहे. या एसयूव्हीची बुकिंग फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होणार आहे.
Kia Syros
Kia Syrosyandex
Published On

दक्षिण कोरिया ब्रँड कियाच्या अनेक कारला भारतीयांनी पसंती दिली आहे. त्यातच आता ही कंपनी एका नव्या एसयूव्ही मॉडेलसह भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. किया इंडियाने बहुप्रतिक्षित किया सिरॉस आज भारतात लाँच केली आहे. आकर्षक डिझाइन, स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि प्रगत सुरक्षितता असलेली ‘किया सिरॉस अद्ययावत सुविधांनी सुसज्ज आहे.

या एसयूव्हीची डिझाइन, तंत्रज्ञान आणि स्‍पेसने सगळ्यांना आकर्षित केले आहे. या मॉडेलमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट रिअर स्‍लाइडिंग, रिक्‍लायनिंग आणि व्हेंटिलेटेड सीट्ससह इतर विविध सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. जसे ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ व लेव्‍हल २ एडीएएससह १६-ऑटोनॉमस सेफ्टी वैशिष्‍ट्ये, ज्‍याला पूरक २० रॉबस्‍ट हाय स्‍टँडर्ड सेफ्टी पॅकेजचे सर्वसमावेशक सूट आहे. किया सिरॉस चार प्रमाणित ट्रिम्‍स व २ पर्यायी ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल. एचटीके, एचटीके (ओ), एचटीके+, एचटीएक्‍स आणि एचटीएक्‍स+, एचटीएक्‍स+ (ओ), जे ग्राहकांच्‍या विविध गरजा व प्राधान्‍यक्रमांची पूर्तता करण्‍यासाठी अनेक पर्याय देतात. तसेच या कारची अंदाजे किंमत ९ ते १६ लाखांपर्यंत आहे. फेब्रुवारी २०२५ पासून या कारची बुकिंग सुरु होणार आहे.

डिझाइन

किया सिरॅासला दमदार फ्रंट लूक देण्यात आला आहे. तसेच कारमध्ये मोठे एलईडी लाईट आणि वर्टिकल एलईडी हेडलाईटही देण्यात आले आहेत. कारच्या बम्परमध्ये फॉक्स स्किड प्लेटसाठी सिल्व्हर एलिमेंट आणि अॅडवान्स ड्रायविंग असिस्टंन्स सिस्टीम (ADAS) साठीचं रडार मॉड्युलही पाहायला मिळत आहे. सिरॉसच्‍या बाहेरील भागामधून कियाचे 'ऑपोझिट्स युनायटेड' तत्त्व दिसून येते, ज्‍यामध्‍ये आकर्षकता व कार्यक्षम वैविध्‍यतेचे संयोजन आहे. या कारची आकर्षक डिझाइन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कियाचे सिग्‍नेचर स्‍टारमॅप एलईडी लायटिंगमुळे एयसूव्हीला एक आकर्षक लुक मिळतो. फ्लश डोअर हँडल, चंकी बी पिलर, ब्लॅक बॉडी क्लॅडिंगसह कारला 17 इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. याशिवाय स्‍टीमलाइन डोअर हँडल्‍स, पॅडल लॅम्‍प्‍ससह किया लोगो प्रोजेक्‍शन आणि प्रबळ कॉन्‍चर्स हे सर्व घटक एसयूव्हीला अधिक आकर्षक करत आहे.

इंटिरिअर

२,५५० मिमी व्‍हीलबेससह सिरॉसचे केबिन सर्वोत्तम इंटीरिअर अनुभव देते.ज्यामध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट स्‍लाइडिंग व रिक्‍लायनिंग, ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स आहेत. फ्रण्‍ट व रिअर व्‍हेंटिलेटेड सीट्स आरामदायीपणा व वैविध्‍यततेला नव्‍या उंचीवर घेऊन जातात. केबिनमध्‍ये ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल - कनेक्‍टेड कार नेव्‍हगिशन कॉकपीट, ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, स्‍पोर्टी अलॉई पेडल्‍स आणि ६४ कलर अॅम्बियण्‍ट मूड लायटिंग, डबल डी-कट स्‍टीअरिंग व्‍हील, ४-वे पॉवर्ड ड्रायव्‍हर सीट अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

तंत्रज्ञान आणि कनेक्‍टीव्‍हीटी

सिरॉसमध्ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट समावेश केला आहे. अद्वितीय सोयीसुविधा व अत्‍याधुनिक कनेक्‍टीव्‍हीटीसह ८० हून अधिक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून ड्रायव्हिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. एसयूव्हीमध्‍ये ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल आहे, तसेच सर्वोत्तम व युजर-अनुकूल इंटरफेस आहे, जे वायरलेस अॅप्‍पल कारप्‍ले आणि अँड्रॉइड ऑटोसह विनासायासपणे कनेक्ट होतात, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर्सना त्‍यांचे आवडते अॅप्‍स व मीडिया सहजपणे उपलब्‍ध होतात.

तसेच, सिरॉस फर्स्‍ट-इन-सेगमेंट ओव्‍हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपडेट्ससह २२ कंट्रोलर्सचे ऑटोमॅटिक अपडेटिंग देते. उत्‍साहवर्धक अनुभवासाठी हार्मन कार्डन प्रीमियम ८ स्‍पीकर्स साऊंड सिस्‍टम, स्‍मार्टफोन वायरलेस चार्जर सारखी वैशिष्‍ट्ये आहेत. कॉल सेंटर-असिस्‍टेड नेव्हिगेशनसह ड्रायव्‍हर्स कुठेही प्रवास करताना रिअल-टाइम मार्गदर्शनाचा आनंद घेऊ शकतात.

सुरक्षितता आणि कार्यक्षमता

कियाच्‍या डिझाइनमध्‍ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य दिले आहे. सुधारित के १ प्‍लॅटफॉर्मवर निर्माण करण्‍यात आलेली सिरॉस उच्‍च दर्जाच्‍या रचनेची खात्री देते. ज्‍यामधून सुधारित क्रॅश प्रोटेक्‍शन व स्थिरता मिळते. या एसयूव्हीमध्‍ये एडीएएस लेव्‍हल २ सह १६ ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, फॉरवर्ड कोलिजन अव्‍हॉयडन्‍स असिस्‍ट, लेन कीप असिस्‍ट, ३६० डिग्री कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर आणि स्‍मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्‍टॉप अँड गो अशी सर्वोत्तम फीचर्स देण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षित व अधिक उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंगचा अनुभव मिळेल. सिरॉसमध्‍ये २० स्‍टँडर्ड रॉबस्‍ट हाय-सेफ्टी वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, हिल स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल, सहा एअरबॅग्‍ज, वेईकल स्‍टेबिलिटी मॅनेजमेंट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्‍ड, यामुळे ड्रायव्‍हर व प्रवाशांच्‍या अधिक सुरक्षिततेची खात्री मिळते.

Kia Syros
PM Awas Yojana: स्वतः चं घर घ्यायचंय? सरकार करणार आर्थिक मदत; PM आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

इंजिन

हूड अंतर्गत, सिरॉसमध्‍ये दोन इंजिन पर्याय आहेत. स्‍मार्टस्‍ट्रीम १.०-लीटर टर्बो पेट्रोलसह ८८.३ केडब्‍ल्‍यू (१२० पीएस) / १७२ एनएम आणि १.५-लीटर सीआरडीआय डिझेलसह ८५ केडब्‍ल्‍यू (११६ पीएस) / २५० एनएम, तसेच मॅन्‍युअल व ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन आहे. २५५० मिमीचे लांब व्‍हीलबेस आणि सुधारित सस्‍पेंशनसह सिरॉस शहरातील ड्राइव्‍हसाठी गतीशीलतेमध्‍ये संतुलन राखत उच्‍च दर्जाच्‍या राइडचा आनंद देते.

किया इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. ग्‍वांगू ली ब्रँडच्या दृष्टिकोनाबाबत म्‍हणाले,'किया इंडियाने नेहमी चॅलेंजरचा उत्‍साह राखला आहे, तसेच नाविन्‍यता, तंत्रज्ञान व ग्राहक-केंद्रित डिझाइनप्रती आम्ही ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत आहोत. पहिल्‍या लाँचपासून आमचा प्रवास उल्‍लेखनीय राहिला आहे. देशभरात उपस्थिती वाढत आहे आणि उच्‍च दर्जाच्‍या, महत्त्वाकांक्षी वेईकल्‍स वितरित करण्‍यावर आमचा फोकस आहे. सिरॉससह आम्‍ही आमचे उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत आहोत, तसेच एसयूव्‍हीच्‍या नवीन मॅाडेल्स ऑफर करत आहोत, ज्‍यामध्‍ये उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे.'

Kia Syros
Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा भाव

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com