ATM rules 2026 google
बिझनेस

New Rules For ATM: ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ATM आणि UPI व्यवहारासाठी आता नवे नियम; खिशावर ताण येणार

ATM And UPI Rules 2026: ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. एटीएम आणि UPI व्यवहार करणं यापुढे महाग होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक बँकांनी आपल्या नियमात बदल केले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.

Priya More

Summary -

  • १ एप्रिल २०२६ पासून एटीएम व्यवहार महाग होणार

  • मोफत व्यवहारांची मर्यादा कमी केली जाणार

  • यूपीआय व्यवहारांवरही मर्यादा लागू होणार

  • HDFC आणि PNB बँकांनी नियमांमध्ये बदल केले

एटीएम आणि UPI व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिल २०२६ पासून एटीएममधील पैसे काढणं महाग होणार आहे. देशातील अनेक बँकांनी आपल्या नियमात बदल केले आहेत. काही बँकांमधील एटीएम सुविधेत तर काही बँकांमध्ये UPI सेवेतील व्यवहार मर्यादेवर बंधन लादलेत. यापुढे यूपीआय ट्रान्जेक्शनवर मर्यादा येणार आहे. तसंच एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत देखील बदल होणार आहे. या नव्या नियमांमुळे ग्राहक पंचायत आक्रमक झाली आहे.

नवीन नियम काय असणार हे आपण जाणून घेणार आहोत...

- भारतात दरमहा एटीएममधून ४१ ते ४४ कोटी नागरिक व्यवहार करतात.

- यूपीआयद्वारे दरमहा सरासरी २० अब्ज ते २२ अब्ज व्यवहार होतात.

- जानेवारी २०२६ मध्ये देशात २१.७० अब्ज यूपीआय व्यवहार झाले.

- भारतात दररोज सरासरी ७० कोटी ते ७३ कोटी यूपीआय व्यवहार होतात.

- यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याच्या व्यवहारावर मर्यादा येणार आहे.

एचडीएफसी बँक -

एचडीएफसी बँकेने महानगरात मोफत व्यवहार मर्यादा ३, तर निमशहरात मोफत व्यवहार मर्यादा ५ केली आहे. मर्यादा ओलांडल्यानंतर व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. अतिरिक्त एटीएम व्यवहारासाठी २३ रुपये टॅक्स आकारला जाणार आहे.

पंजाब नॅशनल बँक -

पंजाब नॅशनल बँक डेबिट कार्डवर रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी करणार आहे. ग्राहकांना यापुढे १ लाखांऐवजी फक्त ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. प्रीमियम कार्डवरील पैसे काढण्याची मर्यादा दीड लाखांवरून आता ७५ हजारांवर आणण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Maharashtra News Live Update:भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT