Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १,२,३ नव्हे ३५ वेळा फेल झाला, पण जिद्द सोडली नाही, UPSC क्रॅक केलीच; IAS विजय वर्धन यांचा प्रवास

IAS Vijay Vardhan Success Story: आयएएस विजय वर्धन यांना एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ३५ वेळा अपयश मिळाले. विजय वर्धन यांनी तरीही हार मानली नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. परंतु सतत अपयश येत असेल तर अनेकजण खचून जातात. असंच अपयश विजय वर्धन यांनाही आलं होतं. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ३५ वेळा ते नापास झाले होते. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अपयशाला एक आव्हान समजून पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. (UPSC Success Story)

विजय वर्धन यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. यावेळी ते आयपीएस अधिकारी झाले. त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. २०२१ मध्ये पहिल्या ७०मध्ये त्यांचा नंबर होता. ते आयएएस अधिकारी झाले.

विजय वर्धन हे मुळचे हरियाणाचे रहिवासी. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये शिक्षण केले. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी ते दिल्लीला गेले. त्यांनी सुरुवातीला अनेक अपयशांना तोंड दिले. परंतु हार मानली नाही. (Success Story of IAS Vijay Vardhan)

विजय यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी जवळपास ३५ वेगवेगळ्या सरकारी परीक्षा दिल्या. परंतु त्यांना सतत अपयश आले. यूपीएससी परीक्षेतही त्यांनी अनेकदा अपयश आले. परंतु त्यांनी स्वतः वर विश्वास ठेवला आणि पुन्हा नव्याने प्रयत्न केले.

विजय वर्धन यांनी शेवटी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांना १०४ रँक मिळाली. त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाले. परंतु त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते.त्यांनी पुन्हा २०२१ मध्ये परीक्षा दिली. तेव्हा त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. (UPSC Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT