नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्समधील कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. भाजपाप्रणित 'अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ' आणि NCPA व्यवस्थापनामध्ये नवा वेतनवाढ करार झाला. भाजपचे राज्य प्रदेशाध्यक्ष तथा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा करार करण्यात आलाय. या नव्या करारानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा तब्बल ७ हजार २५० रुपयांची भरीव वाढ करण्यात आलीय.
या कराराची अंमलबजावणी ०१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या ४ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलीय. या करारानुसार NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा रु. ७,२५० इतकी भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासह कर्मचाऱ्यांना दरवर्षी ५०,००० रुपयांचा बोनस देखील जाणार असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिलीय.
दरम्यान याआधी NCPA मध्ये मुंबई लेबर युनियनचे वर्चस्व होते. मात्र, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आलेत. बहुसंख्य कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत जोडले. त्यानंतर औद्योगिक न्यायालयातील कायदेशीर लढा जिंकला. त्यानंतर या संघटनेने NCPA मधील एकमेव अधिकृत व प्रमाणित कामगार संघटना म्हणून मान्यता मिळवली.
राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यात आलंय. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक 1153.60 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय आधीच घेण्यात आलाय. शासन निर्णयानुसार तांत्रिक खंड वगळून सलग 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 14,010 कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्ती देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.