National Pension System Business Line
बिझनेस

National Pension Scheme: दिवसाला वाचवा फक्त १०० रुपये, दरमहा मिळेल ५० हजाराची पेन्शन; जाणून घ्या गणित

National Pension Scheme Detail in Marathi: या योजनेत तुम्ही तुमच्या महिन्याच्या बचतीपैकी काही बचत केली आणि नियमितपणे शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली, तर निवृत्तीनंतर केवळ चांगल्या निधीचीच व्यवस्था नाही तर दर महिन्याला चांगली पेन्शनही मिळू शकते.

Bharat Jadhav

नॅशनल पेन्शन सिस्टीम ही केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे. यात सेवानिवृत्तीचं वय लक्षात घेऊन गुंतवणूक केली जाते. 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक (सरकारी कर्मचारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी) राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये खाते उघडू शकतो. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक सेवानिवृत्ती म्हणजेच रिटायरमेंटसाठी तयार केलेली योजना आहे. यात तुम्ही नोकरीत रुजू होताच गुंतवणूक करण्याचा प्लान केला तर तुमचं म्हातारपण आनंदात जाईल.

कमी वयापासून तुम्ही महिन्याला बचत करत या योजनेत नियमितपणे गुंतवणूक केली, तर निवृत्तीनंतर चांगला परतावा निधी मिळेलच त्याशिवाय दर महिन्याला चांगली पेन्शनही मिळू शकते.फक्त दररोज शंभर रुपयांची बचत केली तरी तुम्ही निवृत्तीनंतर तब्बल 40 लाख रुपयांचा फंड मिळवू शकतात.

समजून घ्या गणित -

  • गुंतवणूक सुरू करण्याचे वय: 25 वर्षे

  • NPS मध्ये दरमहा गुंतवणूक: रु. 3000

  • 35 वर्षांत एकूण गुंतवणूक: रु 12,60,000 (रु. 12.60 लाख)

  • गुंतवणुकीवर अंदाजे परतावा: 10 टक्के प्रतिवर्ष

  • एकूण निधी: रु 1,14,84,831 (रु. 1.15 कोटी)

  • एन्‍युटी योजनेत गुंतवणूक: 65 टक्के

  • एकरकमी (लम्प सम) रक्कम: रुपये 40,19,691 (40.20 लाख कोटी)

  • पेन्शनपात्र रक्कम: रु 74,65,140 (रु. 74.65 लाख)

  • वार्षिकी परतावा: 8 टक्के

  • मासिक पेन्शन: रुपये 49,768 (सुमारे 50 हजार रुपये)

किती परतावा मिळू शकेल?

NPS मध्ये जमा केलेल्या रकमेचा एक भाग इक्विटीमध्ये गुंतवला जातो, त्यामुळे तुम्हाला या योजनेत खात्रीशीर परतावा मिळू शकत नाही. परंतु PPF सारख्या इतर पारंपारिक दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा जास्त येथे परतावा जास्तीचाच मिळत असतो. जर NPS चा परताव्याचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत त्याने 9% ते 12% वार्षिक परतावा मिळालाय. NPS मध्ये जर तुम्ही फंडाच्या कामगिरीवर समाधानी नसाल तर तुम्हाला तुमचा गुंतवणुकीचा फंड बदलू शकतात.

निवृत्तीनंतर पैसे काढण्याचे नियम

सध्या कोणीही एकरकमी म्हणून एकूण कॉर्पसपैकी 60 टक्के रक्कम काढू शकतो. तर उर्वरित 40 टक्के वार्षिकी योजनेत जातात. नवीन NPS मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकूण निधी 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, ग्राहक वार्षिक योजना खरेदी न करता संपूर्ण रक्कम काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT