Namo Shetkari Yojana Saam Tv
बिझनेस

Namo Shetkari Yojana: निवडणुका संपल्या, आता शेतकऱ्यांना ₹४००० कधी मिळणार? तारीख आली समोर

Namo Shetkari Yojana Installment Date: राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांना अजूनही ८वा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे आठवा आणि नववा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार?

दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता

या तारखेला येऊ शकतात पैसे

केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. केंद्रांच्या पीएम किसानच्या धर्तीवरच राज्यात नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. या योजनेतही पीएम किसानप्रमाणेच दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आता नमो शेतकरीचा ८वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? (Namo Shetkari Installment Date)

नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता याआधीच जमा व्हायला हवा होता, परंतु हे पैसे शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे आता ८वा आणि नववा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळण्याची शक्यता होती. मात्र, अजूनही पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागली आहे. पैसे जमा झाले की नाही यासाठी शेतकरी वारंवार कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत.

नमो शेतकरी योजनेत दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दर तीन महिन्यांनी पैसे जमा केले जातात. आता मागील ८वा हप्ताच जमा झाला नाही. पीएम किसानचा २१वा हप्ता जमा होऊन २ महिने उलटले तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता झालेला नाही. योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी तांत्रिक कारणांमुळे विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

या दिवशी येऊ शकतात पैसे (Namo Shetkari Yojana Installment come On These Date)

पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो. पीएम किसान आणि नमो शेतकरीचे प्रत्येकी २००० हजार रुपये एकत्र येऊ शकतात. किंवा नमो शेतकरीचे दोन हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होळीच्या कालावधीत पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या विरुद्ध अटक वॅारंट जारी

Surya Grahan 2026: १७ फेब्रुवारीला दिसणार सूर्याभोवती दिसणार फायर रिंग; भारतात पाहता येणार का हे ग्रहण?

Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये BNP चा मोठा विजय, तारिक रहमान होणार पंतप्रधान; कोण आहेत?

100 वर्षे जुनी शाळा विकली? बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! ₹६००० एकत्र पाहिजे असेल तर 'हे' काम आजच करा

SCROLL FOR NEXT