Namo Shetkari Yojana Saam Tv
बिझनेस

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Namo Shetkari Yojana 7th Month Installment Recieve Or Not: नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. दरम्यान, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही अशा पद्धतीने चेक करा.

Siddhi Hande

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून २००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने हे पैसे पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता वितरित केला जाणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी निधी वितरित (Namo Shetkari Yojana Installment Credited)

राज्यातील तब्बल ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहे. या योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने १ हजार ९३२ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.

खात्यात पैसे जमा झाले की नाही अशा पद्धतीने करा चेक

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

तुमच्या फोनवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. याचसोबत तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन पैसे ट्रान्सफर झाले की नाही चेक करु शकतात.

ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला याबाबत माहिती मिळणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाऊन करा चेक

याचसोबत तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनदेखील स्टेट्‍स चेक करु शकतात. तुम्हाला सर्वात आधी NSMNY या वेबसाइटला भेट द्यायची आहे. त्यानंतर Beneficiary Status वर क्लिक करा.

यानंतर लॉग इन केल्यावर तुम्हाला आधार नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. यानंतर ओटीपी टाकल्यानंतर Beneficiary Status स्क्रिनवर दिसेल.यानंतर तुम्हाला Eligibility Details हा पर्याय दिसला तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात. आणि तर Ineligibility दिसला तर शेतकरी अपात्र आहे, असा त्याचा अर्थ होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT