Namo Shetkari Yojana Saam Tv
बिझनेस

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Namo Shetakri Yojana Beneficiary List: नमो शेतकरी योजनेतून अनेक लाभार्थ्यांची नावे वगळली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या सर्व माहिती खोट्या असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले?

तुम्हाला पैसे मिळणार की नाही?

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आहे. नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. नमो शेतकरी योजनेत आता ८वा हप्ता कधी येतो याची वाट शेतकरी बघत आहेत. दरम्यान, आता या योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांचे नाव वगळण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळले?

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत ६००० रुपये आणि नमो शेतकरी योजनेत ६००० रुपये दिले जातात. नुकताच पीएम किसानचा २१वा हप्ता देण्यात आला.त्यावेळी योजनेतून अनेकांची नावे वगळण्यात आली. दरम्यान,आता नमो शेतकरी योजनेतूनही ६ लाख शेतकऱ्यांची नावे वगळली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, संबंधित विभागाने ही माहिती फेटाळली आहे. असं काहीही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार की नाही? (Namo Shetkari Installment Get or Not)

दरम्यान,तुम्हाला नमो शेतकरी योजनेत पुढचा हप्ता मिळणार की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुमचं यादीत नाव आहे की नाही हे चेक करा.

सर्वात आधी testdbtnsmny.mahaitgov.in या वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्हाला तिथे बेनिफिशियरी स्टेटस दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर फोनवर ओटीपी येईल. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार की नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

Nails Cutting Tips: नखे कापण्याची योग्य पद्धत कोणती?

SCROLL FOR NEXT