Namo Drone Didi Scheme Announcement Saam TV
बिझनेस

Namo Drone Didi Scheme: सरकारची महिलांसाठी खास योजना! ड्रोन उडवण्याचे ट्रेनिंग अन् १५००० रुपये मासिक वेतन; जाणून घ्या सविस्तर

Latest Government Scheme For Womens: सरकारीने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे नमो दीदी ड्रोन योजना. या योजनेत महिलांना ड्रोन उडवण्याचे ट्रेनिंग दिले जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. यात महिला, शेतकरी, व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. अशीच एक योजना म्हणजे नमो ड्रोन दीदी योजना. नमो ड्रोन दीदी योजनेमुळे कृषी क्षेत्रात आधुनिक गोष्टींचा वापर करता येतो. त्यामुळे शेती व्यवसायाला खूप फायदा होतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ साली ही योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांना कृषी क्षेत्रातील अनेक नवनवीन तंत्र शिकवून त्यांना सक्षम बनवायचे आहे. या योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित महिलांना १५००० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याचसोबत दर महिन्याला १५ हजार रुपये दिले जातात. ज्या महिला ड्रोन दीदी म्हणून काम करतील त्यांनाच हे मानधन दिले जाणार आहे. १० ते १५ गावांचे कलस्टर तयार करुन त्यांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

या योजनेत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रक्षिशण दिले जाणार आहे. त्याचसोबत तांत्रिक माहितीदेखील दिली जाणार आहे. ड्रोनचा वापर शेतीच्या कामांसाठी कसा करायचा याचेही प्रक्षिशण दिले जाणार आहे. यामध्ये पिकांच्या देखरेखीपासून ते खते, बियाणे पेरण्यापर्यंत ड्रोनचा कसा वापर करायचा याची माहिती दिली जाणार आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटाच्या सदस्य असणे गरजेचे आहे. महिलांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, सेल्फ हेल्फ ग्रुप आयडी कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT