Ladki Bahin Yojana Update google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का! 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांनाही अर्जाची संधी नाही

Maharashtra Women Scheme : लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पडताळणीनंतर अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. २१ वर्षे पूर्ण झालेल्या नव्या पात्र महिलांनाही अर्ज करता येत नसल्याने लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

Sakshi Sunil Jadhav

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सोलापूरात या योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामधल्या काही पात्र महिलांपर्यंत दर महिन्याला मिळणारा १५०० रूपयांच्या पोहोचत नसल्यामुळे त्या महिला अनेक दिवसांपासून बालविकास विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातल्या ११ लाख ३० हजार ५६३ महिलांना या योजनेचा लाभ सुरुवातीला मिळाला. त्यासाठी राज्य सरकारकडून महिन्याला १६९ कोटी रुपये वितरीत केले होते. पण नुकत्याच झालेल्या ईकेवायसी पडताळणीत मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे आणि जिल्ह्यासाठी लागणारा निधीही कमी झाला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana installment )अटींनुसार चारचाकी वाहन असलेल्या महिला, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिला, २१ वर्षांखालच्या किंवा ६५ वर्षांवरच्या महिला तसेच इतर काही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळ्यात आलं आहे.

लाडकीच्या योजनेत आणखी एक महत्वाची समस्या समोर आली आहे. योजना सुरू झाली तेव्हा १९ किंवा २० वर्षांच्या असलेल्या अनेत तरुणी आता २१ वर्षांच्या झाल्या आहेत. नियमानुसार त्या योजनेसाठी पात्र आहेत. पण नवीन अर्ज प्रक्रिया सुरू नसल्यामुळे त्यांना अर्ज करता येत नाही. त्यामुळे बऱ्याच पात्र तरुणींना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

पडताळणीनंतर अनेक महिलांचा लाभ बंद झाला. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करून सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे महिला थेट महिला व बालविकास कार्यालयात जाऊन चौकशी करत आहेत. पण लाभ कधी सुरू होईल याची कोणतीही अधिकृत माहिती अधिकाऱ्यांकडे स्पष्ट नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन पात्र महिलांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आता महिलांकडून केली जात आहे. (government scheme ladaki bahin)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

SCROLL FOR NEXT