Maharashtra Ladki Bahin Scheme google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: जुलैचा पहिला आठवडा संपला, जूनचा १५०० रुपयांचा हप्ता कधी येणार? लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट

Maharashtra Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. यासंदर्भात संभाव्य तारिख समोर आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आहे. राज्यातल्या सर्वच लाभार्थी महिला योजनेचा लाभ घेतात. सध्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही. त्यांसदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पात्र महिलांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जून महिन्याच्या हप्त्याबद्दल सुत्रांनी दिलेली माहिती (ladki bahin yojana june installment date)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा रखडलेला हप्ता १२ ते १५ जुलैदरम्यान पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण याबद्दल राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यातल्या सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यावर डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीच्या मदतीने प्रत्येकी १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.

दुसरीकडे, ई-केवायसी पडताळणीनंतर राज्यातल्या जवळपास ८० लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे या महिलांना सध्या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची शक्यता आहे.

दरम्यान सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या सुमारास लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. पण यावेळी जून महिन्याचा हप्ता उशीराने मिळत असल्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलेले आहे. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत कैलास लस्सी स्वीट मार्टच्या किचनला आग, कर्मचाऱ्यांनी केली स्वतःची खिडकीतून सुटका

Monsoon Hacks : बुरशीमुळे लोणचे फेकून देताय? थांबा! पावसाळ्यात वापरा 'ही' ट्रिक, लोणचे महिनोनमहिने राहील ताजे

LPG News: मोठी बातमी! LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय

Sunita Ahuja: 'मला घरी जायचंय...'; गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा लॉक अपमध्ये ढसाढसा रडायला लागली

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बड्या नेत्याने तडकाफडकी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?

SCROLL FOR NEXT