Shruti Vilas Kadam
ग्रीन टीचा आय पॅड्स डोळ्यांना लावा. ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफीन डोळ्यांभोवतीची सूज कमी करण्यास मदत करतात. सकाळी उठल्यानंतर हा उपाय विशेष फायदेशीर ठरू शकतो.
नियमित वापर केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी दिसण्यास मदत होऊ शकते. यामुळे चेहरा अधिक ताजातवाना वाटतो.
मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवर ताण येतो. थंड ग्रीन टी आय पॅड्स डोळ्यांना गारवा देऊन आराम देतात.
वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स किंवा ग्रीन टीमध्ये भिजवलेले कॉटन पॅड्स फ्रिजमध्ये थंड करून काही मिनिटे डोळ्यांवर ठेवल्यास नैसर्गिक आय पॅड्स तयार होतात.
ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
बाजारातील महागड्या आय पॅचेसऐवजी हा घरगुती उपाय कमी खर्चात करता येतो आणि नियमित वापरासाठीही सोयीस्कर ठरतो.
आय पॅड्स 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ डोळ्यांवर ठेवू नका. डोळ्यांना जळजळ, संसर्ग किंवा कोणतीही अॅलर्जी असल्यास हा उपाय करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.