Shruti Vilas Kadam
शिवाली परबने पिवळ्या रंगाची आकर्षक डिझायनर साडी परिधान करत पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा सुंदर मिलाफ सादर केला.
साडीसोबत तिने परिधान केलेला स्टायलिश कॉलर नेक ब्लाऊज संपूर्ण लूकला वेगळी ओळख देतो. फॅशनप्रेमींसाठी हे डिझाइन उत्तम पर्याय ठरू शकते.
जड दागिन्यांऐवजी शिवालीने हलकी आणि आकर्षक ज्वेलरी निवडली. त्यामुळे तिचा लूक अधिक क्लासी आणि सोज्वळ दिसतो.
न्यूड टोन मेकअप, उठावदार डोळे आणि नैसर्गिक लिप शेडमुळे तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
सुंदर हेअरस्टाईलमुळे संपूर्ण लूक अधिक आकर्षक झाला आहे. पारंपरिक साडीसोबत ही स्टाईल सहज कॅरी करता येते.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या लूकचं भरभरून कौतुक केलं. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजींसह प्रतिक्रिया दिल्या.
लग्न, हळदी, सण किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी शिवालीचा हा पिवळ्या साडीतील लूक उत्तम फॅशन इन्स्पिरेशन ठरू शकतो. तिच्या स्टायलिंगची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.