Shruti Vilas Kadam
घरातील कामांचं नियोजन, कुटुंबातील प्रत्येकाची काळजी, वाढदिवस, शाळेची कामं, दैनंदिन नियोजन अशा अनेक गोष्टींचा मानसिक ताण महिलांवर असतो. याला "मेंटल लोड" म्हणतात.
मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ या टप्प्यांमध्ये हार्मोनल बदल होतात. त्यामुळे मूड, एनर्जी आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी समजून घेणं आणि साथ देणं महत्त्वाचं असतं.
करिअर, घर, मुलं, नाती आणि समाजाच्या अपेक्षा यामध्ये अनेक महिलांना एकाच वेळी सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यामुळे मानसिक ताण निर्माण होऊ शकते.
उशिरा घरी जाणं, एकट्याने प्रवास करणं किंवा अनोळखी ठिकाणी जाणं यावेळी अनेक महिलांच्या मनात सुरक्षिततेची चिंता असते. त्यांच्या या भावनांचा आदर करणं नात्यासाठी महत्त्वाचं आहे.
अनेकदा महिला त्यांची समस्या सांगतात तेव्हा त्यांना लगेच उपाय नको असतो. त्याऐवजी त्यांच्या भावना समजून घेणारा आणि शांतपणे ऐकून घेणारा जोडीदार त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो.
सततच्या जबाबदाऱ्यांमधून थोडा 'मी-टाईम' मिळणं मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतं. याचा अर्थ नात्यापासून दूर जाणं नसून स्वतःला मानसिकदृष्ट्या ताजंतवानं करणं हा असतो.
प्रत्येक महिला वेगळी असते. त्यामुळे गृहीत धरण्यापेक्षा तिचं म्हणणं ऐकणं, भावना समजून घेणं आणि परस्पर आदर राखणं यामुळे नातं अधिक मजबूत आणि विश्वासार्ह बनतं.