Maharashtra Budget 2025  Saam tv
बिझनेस

Maharashtra Budget : लाडक्या बहि‍णींना आतापर्यंत ₹१७,५०५.९० कोटी, फडणवीस सरकारची माहिती

Maharashtra Budget : २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला व मुलींचे पुनर्वसन, सक्षमीकरण तसेच आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्याने जून, २०२४ मध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु केली.

Namdeo Kumbhar

Maharashtra Budget 2025 : महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यात आजपासून तीन हजार रूपये येण्यास सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात येण्यास सुरूवात होणार आहे. आतापर्यंत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती रूपये सरकारकडून आर्थिक मदत म्हणून देण्यात आले, याबाबत माहिती समोर आली आहे. जून २०२४ मध्ये राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती, आतापर्यंत जवळपास २.३८ कोटी महिलांच्या खात्यात हप्ते गेले आहेत.

उपमुख्यमंत्री, राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2024-25 चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला. त्यामध्ये २०२४-२५ या आर्थिक महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे जमा झाले, त्याबाबत आर्थिक पाहणी अहवालातून माहिती देण्यात आली. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला व मुलींचे पुनर्वसन, सक्षमीकरण तसेच आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्याने जून, २०२४ मध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु केली. या योजनेतंर्गत डिसेंबर, २०२४ पर्यंत २.३८ कोटी लाभार्थी महिलांना ₹ १७,५०५.९० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजिंग ठरली होती. लोकसभेत अपयश आल्यानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. विधानसभेला त्याचा फायदा झाला.महायुती सरकारला भरघोस यश मिळाले. विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेवर टीका करण्यात आली, राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्याची टीका केली जात आहे.

आर्थिक अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

सन २०२४-२५ च्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन २०२३-२४ च्या तुलनेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ६.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२४-२५ मध्ये 'कृषि व संलग्न कार्य', 'उद्योग' व 'सेवा' या क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धित अनुक्रमे ८.७ टक्के, ४.९ टक्के व ७.८ टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन २०२४-२५ मध्ये अंदाजित सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ ४५,३१,५१८ कोटी आहे तर अंदाजित वास्तविक (सन २०११-१२ च्या स्थिर किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ २६,१२,२६३ कोटी आहे. पहिल्या सुधारित अंदाजांनुसार सन २०२३-२४ चे अंदाजित सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ₹ ४०,५५,८४७ कोटी आहे, तर सन २०२२-२३ मध्ये ते ₹ ३६,४१,५४३ कोटी होते. सन २०२३-२४ चे अंदाजित वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न ₹ २४,३५,२५९ कोटी आहे, तर सन २०२२-२३ मध्ये ते ₹ २२,५५,७०८ कोटी होते. पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा सर्वाधिक (१३.५ टक्के) आहे. सन २०२४-२५ मध्ये दरडोई राज्य उत्पन्न ₹ ३,०९,३४० अंदाजित असून सन २०२३-२४ मध्ये ते ₹ २,७८,६८१ होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT