MSRTC NCMC Card Update saam tv
बिझनेस

MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! NCMC कार्डबाबत नेमकं काय बदललं?

NCMC Card Recharge Rules : एसटी महामंडळाने NCMC कार्ड रिचार्जचे नियम बदलले आहेत. आता महिला आणि जेष्ठ नागरिकांना पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार असून प्रवास सोयीचा होईल.

Sakshi Sunil Jadhav

एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC कार्डच्या रिचार्ज नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. आता या कार्डामध्ये पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गरजेनुसार अगदी कमी रक्कमही कार्डामध्ये जमा करता येईल. यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक आणि अमृत जेष्ठ नागरिकांना या निर्णयाचा फायदा होईल.

आता ५ रुपयांपासून करता येणार रिचार्ज

एसटीच्या NCMC कार्डमध्ये रिचार्ज करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. रिचार्ज करताना आकारलं जाणार शुल्क आणि कार्डामध्ये प्रत्यक्ष जमा होणारी रक्कम यामध्ये फरक पडत होता. त्यामुळे प्रवाशांचे पैसे वाया जात असल्याची तक्रार होती. ही अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने रिचार्ज शुल्क व्यवस्थेत बदल केलाय. आता प्रवाशांना ५,१०,१५,२० अशा पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे कार्डमध्ये आवश्यक तेवढीच रक्कम जमा करणं शक्य होईल. विशेषत: ग्रामीण भागातल्या प्रवाशांना याचा फायदा होईल.

रिचार्ज शुल्कातही महत्त्वाचा बदल

NCMC कार्डमध्ये टॉपअप करण्यासाठी अधिकृत एजंटला प्रत्येक व्यवहारामागे ११.८० रुपये कमिशन दिले जात होते. यामध्ये वेगवेगळ्या करांचाही समावेश होता. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली रक्कम आणि कार्डमध्ये जमा होणारी रक्कम यामध्ये तफावत निर्माण होत होती.

आता अधिकृत एजंट आणि एसटी बसमधल्या वाहकांकडून टॉपअपसाठी एकसमान शुल्क आकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्यवहारावर नियमानुसार कर आकारला जाणार आहे. यामुळे रिचार्ज प्रोसेसमध्ये जास्त स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.

BHIM ॲपसह रिचार्जचे अनेक पर्याय

प्रवाशांना NCMC कार्ड रिचार्ज करण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. BHIM ॲपच्या मदतीने कार्डामध्ये पैसे भरता येतात. तसेच एसटी बसमधल्या वाहक, बसस्थानकांवर टॉपअप काउंटर आणि अधिकृत एजंट यांच्याकडूनही रिचार्ज करता येणार आहे.

१ कोटी ४७ लाख प्रवाशांची नोंदणी

एसटी महामंडळाकडून अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी १६ फेब्रुवारीपासून NCMC कार्डाची नोंदणी आणि वितरण सुरू करण्यात आलं आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत १ कोटी ४७ लाख सवलतधारकांनी या कार्डासाठी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या प्रवाशांना ३० दिवसांच्या आत कार्ड उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे.

कार्ड मिळालं नाही तरी प्रवास करता येणार

NCMC कार्ड मिळायला उशीर झाल्यावर नोंदणी पूर्ण केलेल्या प्रवाशांना QR कोड असलेली पावती दाखवून तुम्ही एसटीने प्रवास करू शकता. अधिकृत एजंटकडून या पावतीची प्रिंटसुद्धा घेता येते. आधारकार्डाच्या माध्यमातून ओळख पडताळणी किंवा बायोमेट्रिक नोंदणीची सुविधाही मिळेल. भविष्यात फेस ऑथेंटिकेशनचा ऑप्शन सुरू करण्याचं नियोजन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आवादा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक

Paithani Saree Designs : शाही थाट, पारंपरिक साज! नववधूच्या सौंदर्यात भर घालतील पैठणीचे 'हे' ७ हटके डिझाइन्स

Home Remedies : हिवाळ्यात घसा खवखवतोय, खोकला काही केल्या जात नाही? आजच करा हे ७ सोपे बदल

Maharashtra Politics: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदेची फिल्डिंग, शिवसेनेच्या विस्तारासाठी मास्टरस्ट्रोक, आतापर्यंत काय-काय घडलं?

Head Tingling : डोक्याला अचानक मुंग्या येतात? 'या' गंभीर आजाराचे आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात

SCROLL FOR NEXT