ST Pass Online meta ai
बिझनेस

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

MSRTC Online Pass : एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतला ४ ते ७ दिवसांचा पास आता ऑनलाइन काढता येणार आहेत. वेबसाइट किंवा अॅपवरून पास मिळेल आणि QR कोडने पडताळणी होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. एसटीच्या लोकप्रिय ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत मिळणारे ४ दिवस आणि ७ दिवसांचे पास आता ऑनलाइन काढता येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास घेण्यासाठी एसटीच्या बसस्थानकात किंवा आगारात जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज लागणार नाही.

महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर हे ऑनलाइन पास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. प्रवाशांना आपल्या सोयीनुसार ऑनलाइन पद्धतीने पास काढता येईल, प्रवासाच्या वेळी या पासची प्रिंट काढून सोबत ठेवता येईल किंवा मोबाईलमध्ये सेव्ह केलेली पीडीएफ प्रिंट दाखवता येईल.

या ऑनलाइन सुविधेमुळे विशेषत: सुट्टीच्या काळात, सणासुदीच्या दिवसात किंवा कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पास काढण्याची प्रोसेस जास्त सुलभ आणि वेळेची बचत करणारी होण्याची अपेक्षा आहे.

प्रवासावेळी कशी होणार पडताळणी?

ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या पासवर QR कोड दिलं जाईल. प्रवासाच्या वेळेस एसटीच्या अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून हा QR कोड स्कॅन करून पासची पडताळणी केली जाईल. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाच्या वेळी पासची PDF प्रत मोबाईलमध्ये व्यवस्थित उपलब्ध ठेवणे महत्त्वाचं आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

१. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचे ४ आणि ७ दिवसांचे पास ऑनलाइन उपलब्ध आहेत.

२. अधिकृत एसटी वेबसाइट आणि मोबाईल ॲपवरून पास काढता येणार आहे.

३. प्रवासाच्या वेळी पासची प्रिंट किंवा मोबाईलमधील PDF दाखवता येईल.

४. पासवरील QR कोड स्कॅन करून पडताळणी केली जाणार.

५. ऑनलाइन सुविधेमुळे पास काढण्यासाठी आगारात जाण्याची आणि रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील प्रवाशांना प्रवासाचे नियोजन जास्त सहजपणे करता येणार असून, डिजिटल पद्धतीने पास उपलब्ध झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुविधा आणखी सोपी होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT