Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Sakshi Sunil Jadhav

राजमा

किडनी बीन्स हा कडधान्याचा प्रकार असून त्यामध्ये प्रोटीन, फायबर, लोह, फोलेट, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

Rajma | pintrest

महत्त्वाची माहिती

किडनीसारख्या आकारामुळे राजम्याला ‘किडनी बीन्स’ हे नाव मिळालं असावं, तरी त्या खाल्ल्याने खराब झालेली किडनी थेट दुरुस्त होते, असा दावा आहे.

kidney beans nutrition | pinterest

किडनीवर होणारा परिणाम

किडनी बीन्स खाल्ल्याने क्रॉनिक किडनी डिसीजमुळे झालेलं नुकसान किंवा किडनीवरचे डाग स्वतःहून पूर्णपणे भरून निघत नाहीत.

kidney beans nutrition | pinterest

किडनीला होणारा फायदा

योग्य प्रमाणात कडधान्यांचा आहारात समावेश केल्यावर फायबर आणि वनस्पतीजन्य प्रोटीनमुळे किडनीच्या आरोग्याला मदत मिळू शकते.

Kidney Diseases | pinterest

संशोधनातले सत्य

काही प्राण्यांवरच्या अभ्यासामध्ये किडनी बीन्समधल्या घटकांमुळे किडनीच्या नुकसानाविरुद्ध सकारात्मक परिणाम दिसले आहेत, पण मानवांमध्ये ‘किडनी रिपेअर’ होतं असं सिद्ध झालेलं नाही.

kidney beans nutrition | pinterest

पोटॅशियमकडे लक्ष द्या

किडनीचे कार्य कमी झालेल्या व्यक्तींमध्ये राजम्यामधले पोटॅशियम शरीरात साचत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांचं प्रमाण ठरवावं.

kidney damage

गॅस आणि पोटफुगी

राजम्यामध्ये फायबर आणि काही पचायला कठीण घटक असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस, पोटफुगी किंवा अस्वस्थता होऊ शकते.

kidney beans | pinterest

योग्य पद्धत

किडनी बीन्स रात्रभर भिजवून त्यातील पाणी फेकून द्यावे आणि नंतर उच्च तापमानावर किमान १० मिनिटं चांगलं उकळून शिजवा.

Rajma and Kidney Health

NEXT : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

Astrology 2026 | meta ai
येथे क्लिक करा