MSME Registration Benefits  google
बिझनेस

Business सुरू करण्यासाठी MSME मध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे का? काय आहेत फायदे

MSME Registration Benefits : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असाल किंवा आधीच व्यवसाय सुरू केला असेल, तर त्याची MSME मध्ये नोंदणी करा. यात नोंदणी केल्यास अनेक प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो.

Bharat Jadhav

How To MSME Registration : जर तुम्ही व्यवसाय सुरू करणार असाल किंवा स्टार्टअप करत असाल, तर तुमचा व्यवसाय वाढवणं गरजेचं असतं. व्यवसाय वाढवण्यासाठी अनेकवेळा पैसा हवा असतो. पण तुम्हाला माहितीये का तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी सरकारच्या काही योजना आहेत, ज्या तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील. ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी एमएसएमईमध्ये करावी लागेल. जे व्यवसाय हे छोटे, लघु, मध्यम स्तरावर असतात. त्यांना एमएसएमई (MSME) (Micro, Small and Medium Enterprises) म्हटलं जातं.

या व्यवसायांची नोंदणी करता येईल

कोणताही व्यवसाय किंवा स्टार्टअप जे लघु-उत्पादन (मॅन्यूफॅक्चरिंग) (manufacturing) किंवा सेवेशी संबंधित असेल,त्याची एमएसएमईमध्ये नोंदणी करणं आवश्यक असतं.

उत्पादन मॅन्यूफॅक्चरिंग: कपडे तयार करणे, अन्न प्रक्रिया करणे, प्लास्टिकच्या वस्तू बनवणे, धातूशी संबंधित युनिट्स (नट-बोल्ट इ.) बसवणे इत्यादी व्यवसाय यात येतात.

सेवा: ब्युटी पार्लर किंवा सलून उघडणे, आयटी सेवा प्रदान करणे, जाहिरात एजन्सी उघडणे, लॉजिस्टिक कंपनी सुरू करणे इत्यादी.

अशी नोंदणी करा

  • अधिकृत वेबसाइट msme.gov.in वर जा

  • त्यानंतर तुम्हाला तेथे उद्यम नोंदणीचा पर्याय दिसेल. Udyam Registration (Online Registration for MSME) त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर याच्या खाली असलेल्या चौकटीत लिहिलेल्या For New Entrepreneurs who are not Registered yet as MSME or those with EM-II वर क्लिक करा.

  • आता एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव लिहावे लागेल.

  • यानंतर खालील निळ्या बॉक्समध्ये लिहिलेले Validate & Generate OTP वर क्लिक करा.

  • तुमच्या आधारशी लिंक केलेल्या फोन नंबरवर एक OTP येईल. यानंतर तेथे OTP टाइप करा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

  • यानंतर तुमच्या व्यवसायाची नोंदणी पूर्ण होईल आणि १२ अंकी कार्ड क्रमांक म्हणजेच उद्योग आधार तयार केला जाईल.

नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक

  • कंपनीचे संचालक, भागीदार किंवा मालक यांचे आधार कार्ड

  • व्यवसायाचा पॅन कार्ड द्यावे लागेल.

  • औद्योगिक परवान्याची प्रत

  • व्यवसाय बँक खात्याचा तपशीलही द्यावा लागेल.

  • व्यवसायाशी संबंधित वस्तूंच्या खरेदी-विक्रीशी संबंधित बिले.

  • व्यवसाय जेथे आहे त्या ठिकाणाचा पत्ता, यात वीज बिल, मालमत्ता कर तपशील इत्यादींची माहिती द्यावी लागेल.

एमएसएमईमध्ये नोंदणीचे फायदे

  • बँकेकडून कमी व्याजावर कर्ज मिळते.

  • देशभरात कुठेही प्रदर्शने भरवली जातात, तिथे स्टॉल उभारण्याचा खर्च सरकार उचलत असते.

  • कर सवलत उपलब्ध आहे.

  • आंतरराष्ट्रीय व्यवसायात मदत होते.

  • पेटंट नोंदणीमध्ये सबसिडी उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT