MP Kisan Kalyan Yojana google
बिझनेस

MP Kisan Kalyan Yojana: शेतकऱ्यांना १४ वा हप्ता कधी मिळणार? लाभार्थ्यांनी आत्ताच घ्या जाणून

MP Kisan Kalyan Yojana 14th Installment Date: एमपी किसान कल्याण योजनेचा १४वा हप्ता अजुनही आलेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तसेच याचे ४ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार नेहमीच मदत करत असतं. शेतकऱ्यांसाठी भारतात अनेक योजना राबवल्या जातात. त्यातील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री किसान कल्याण योजना आहे. ही योजना मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून सुरु करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत ३१ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. मात्र १४ आणि १५ वा हप्ता कधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये अजुनही कोणत्याच अधिकाऱ्यांची माहिती समोर आलेली नाहीये. तर राज्यातले ८० लाखहून अधिक शेतकरी याचा लाभ घेतात. पण १४वा हप्ता अद्याप अनेकांच्या खात्यात जमा झालेला नाही.

कधी येणार १४वा हप्ता?

किसान कल्याण योजनेचा चौदावा हप्ता कधी येणार याकडे सगळ्याच शेतकऱ्यांचे लक्ष आहे. तर या योजनेचा शेवटचा हप्ता हा ऑगस्ट २०२५ मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर या योजनेबद्दल कोणत्याही घोषणा केल्या गेल्या नाहीत.

शेतकऱ्यांना ४,००० रुपये एकत्र मिळणार का?

शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ कसा मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये सरकार एकाच वेळी दोन हप्ते खात्यात पाठवेल अशी शक्यता आहे. म्हणजेच एकूण ४००० रुपये तुमच्या खात्यात येतील. याचा हप्ता हा प्रत्येकी २ हजार रुपये असतो. मात्र याचा काही ठोस पुरावा नाही.

यादी कशी तपासावी?

ज्या शेतकरी लाभार्थ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही, त्यांनी खात्यात तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठी राज्याच्या अधिकृत वेब पोर्टलला भेट द्या. तिथे "Beneficiary Status" या पर्यायावर क्लिक करा. मग तुमचा आधार क्रमांक, बॅंकेचा तपशील किंवा पीएम-किसान आयडी टाका. यामध्ये कोणतीही चुक होणार नाही, याची काळजी घ्या. शेवटी पेमेंटचा तपशील पाहण्याठी ओटीपी टाका. तुम्हाला यामध्ये सर्व तपशील दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT