Rs 1000 Currency Note can recirculation SAAM TV
बिझनेस

Rs 1000 Currency Note : ₹ 1000 ची नोट पुन्हा चलनात येणार का? संसदेत मंत्र्यांनी सर्व काही सविस्तर सांगितलं

Rs 1000 Currency Note can recirculation : २००० रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा मुद्दा संसदेत गाजला.

Nandkumar Joshi

Rs 1000 Currency Note can recirculation : २००० रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा मुद्दा संसदेत गाजला. त्यात २०१६ मध्ये चलनातून बाद करण्यात आलेली १००० रुपयांची नोट पुन्हा चलनात येणार का? असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला. त्यावर सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी स्पष्टपणे उत्तरे दिली.

२००० रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा मुद्दा, तसेच १००० रुपयांची नोट पुन्हा चलनात येणार का? २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याच्या अंतिम मुदत पुन्हा वाढवून मिळणार का? आदी प्रश्न विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेत उपस्थित केले. त्यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी स्पष्टपणे उत्तरे दिली. (Tajya Marathi Batmya)

यावर्षी मे महिन्यात सरकारने (Government) २००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद आणि त्या सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करण्याची घोषणा केली होती. २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत जमा करता येणार आहेत. तोपर्यंत २००० रुपयांची नोट लीगल टेंडरच्या स्वरुपात राहणार आहे.

विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी सरकारला याबाबत संसदेत प्रश्न विचारले. त्यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तरे दिली.२००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याच्या अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. ३० सप्टेंबरपर्यंत डेडलाइन आहे. निश्चित अंतिम मुदतीच्या आत नोटा बँकांमध्ये (Banks) जमा करायच्या आहेत. आता या नोटा जमा करण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

पुन्हा नोटबंदी होणार का?

संसदेत काळा पैसा आणि नोटबंदीसंदर्भातही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काळा पैसा रोखण्यासाठी सरकार पुन्हा नोटबंदीचा विचार करत आहे का? असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर पंकज चौधरी म्हणाले की, सरकार सध्यातरी कुठल्याही प्रकारची नोटबंदी किंवा चलन बंद करण्याच्या विचारात नाही. दरम्यान, २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्याचवेळी २००० रुपयांची नोट चलनात आणली होती. ही नोटही यावर्षी चलनातून बंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT