EPFO Latest News : 6 कोटींहून अधिक नोकरदारांसाठी खूशखबर, PF संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

PF Interest Rate : पीएफ खातेधारकांना मागील वर्षीच्या तुलनेत जमा रकमेवर अधिक व्याज मिळणार आहे.
EPFO Latest News In Marathi
EPFO Latest News In MarathiSAAM TV
Published On

PF Interest Rate News : ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना पीएफच्या रकमेवर अधिक व्याज मिळणार आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी पीएफ खातेधारकांना मागील वर्षीच्या तुलनेत ०.०५ टक्के अधिक व्याज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ६ कोटींहून अधिक सदस्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. पीएफधारकांना ०.०५ टक्के अधिक व्याज मिळणार आहे. EPFO ने यासंदर्भात शिफारस केली होती. त्यावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. (Tajya Marathi Batmya)

EPFO Latest News In Marathi
ITR Filling Process: आयटीआर फाइल करताना खर्च किती येतो? फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता? वेळेत न भरल्यास दंड आकारला जातो का?

EPFO ने यावर्षी म्हणजेच २८ मार्च रोजी पीएफ खात्यातील जमा रकमेवर व्याज वाढवण्याची शिफारस केली होती. सदस्यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के व्याज मिळावा, असे ईपीएफओने म्हटले होते. ही शिफारस मान्य करून सरकारनेही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याचा लाभ ६ कोटींपेक्षा अधिक सदस्यांना मिळणार आहे. याआधीच्या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर ८.१० टक्के होता.

EPFO Latest News In Marathi
Majhi Kanya Bhagyashree Yojana: तुमच्या मुलीलाही मिळू शकतात 50 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे 'माझी कन्या भाग्यश्री योजना'

सर्व पीएफ कार्यालयांना आदेश

सरकारने सोमवारी यासंदर्भातील निर्देश सर्व प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी सर्व पीएफ खातेधारकांना ८.१५ टक्के व्याजदर द्यायला हवा, असे त्यात म्हटले आहे. या निर्णयाचा लाभ ६ कोटींहून अधिक खातेधारकांना मिळणार आहे. यावर्षी मार्चमध्येच EPFO ने व्याजदर वाढवण्यात यावे, अशी शिफारस केली होती.

आता यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व प्रादेशिक कार्यालयांनी व्याजाची रक्कम पीएफ खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com