During a monsoon storm, a tree collapsed on a parked car – Know your insurance rights and how to claim compensation saam tv
बिझनेस

Car insurance: वादळी पावसात कारवर झाड पडले तर विमा मिळतो का?

Car insurance claim: झाड पडल्यामुळे कारचे नुकसान झालंय का? तुमच्या वाहनाचा विमा मिळतो का? कशा पद्धतीने क्लेम करायचा त्याबद्दल तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या.

Bharat Jadhav
  • वादळामुळे कारवर झाड पडलं तर 'comprehensive policy' असल्यास विमा क्लेम करता येतो.

  • क्लेमसाठी पोलिस रिपोर्ट, फोटो आणि इतर पुरावे आवश्यक असतात.

  • प्रत्येक विमा पॉलिसी वेगळी असते, त्यामुळे क्लेम करण्यापूर्वी अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.

पावसाळ्यात अनेक भागात मुसळधार पाऊस आणि वादळाची समस्या उद्भवत असतात. त्याच दरम्यान जर मोकळ्या जागेवर पार्क केलेल्या वाहनांवर झाडे पडण्याचा धोका असतो. झाड पडून कारचे नुकसान झाले तर विमा कंपनी नुकसानाची भरपाई करते का हे जाणून घेऊ. पावसाळ्यात अनेक भागात मुसळधार पाऊस आणि वादळ येत असते. या वादळात अनेक झाडं पडत असतात. जर एखादे झाड तुमच्या वाहनावर पडले तर तुम्हाला विमा मिळतो का? हा प्रश्न अनेकांना पडला असेल त्याचे उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊ. बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्सचे मोटर डिस्ट्रीब्यूशन प्रमुख सुभाशिष मजुमदार यांनी उत्तर दिलंय.

“जर तुमचे वाहन मोकळ्या जागेत उभे असेल आणि वादळ किंवा मुसळधार पावसामुळे त्यावर झाड पडले तर, कॉम्प्रिहेन्सिव मोटार विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते. या पॉलिसीमध्ये 'स्वतःचे नुकसान' कलमाअंतर्गत पूर, वादळ, चक्रीवादळ आणि झाडे पडणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश असतो. जर क्लेम विहित अटी आणि शर्तींनुसार असेल. तर विमा कंपनी सहसा छप्पर, बोनेट, विंडस्क्रीन यासारख्या भागांच्या दुरुस्तीचा खर्च उचलते.

या प्रकारच्या क्लेममध्ये पॉलिसीधारकाला काही रक्कम भरावी लागते. म्हणजेच विमा कंपनी संपूर्ण रक्कम देत नाही. जर तुमच्याकडे (झिरो डिप्रिशिएशन कवर) शून्य घसारा कव्हर नसेल, तर त्या पार्ट्सच्या घसारा नुसार रक्कम देखील कमी केली जाऊ शकते.

क्लेमसाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे?

घटनेच्या २४ ते ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे आवश्यक आहे.

सर्वेक्षणाशिवाय वाहन चालवू नका किंवा दुरुस्ती करू नका.

क्लेम होण्यासाठी नुकसानग्रस्त कारचा फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवा.

गंभीर प्रकरणांमध्ये स्थानिक संस्था किंवा पोलीस पंचनामा सुद्धा आवश्यक असू शकतो.

‍अॅड-ऑन घेणे आवश्यक आहे का?

मुसळधार पाऊस आणि वादळांचा धोका असलेल्या भागात राहणाऱ्यांनी शून्य घसारा, इंजिन संरक्षण आणि रिटर्न टू इनव्हॉइस सारखे अॅड ऑन नक्कीच करून घ्यावे. हे अ‍ॅड-ऑन खर्च कमी करण्यास आणि क्लेमची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करतात.

जर झाड पडल्याने तुमच्या गाडीचे नुकसान झाले असेल आणि तुमच्याकडे सक्रिय कॉम्प्रिहेन्सिव विमा पॉलिसी असेल, तर क्लेम मिळणे शक्य आहे. परंतु त्याच्या प्रक्रियेबद्दल आणि अटींबद्दल योग्य माहिती असणे महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही आपत्तीच्या वेळी क्लेम करण्यासाठी अधिक त्रास होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gotya Geete Beed : महादेव मुंडे हत्या प्रकरणात फरार गोट्या गीतेला राजकीय आश्रय? पोलिसांच्या भूमिकेवर संशय

Budhwar Upay: गणपती बाप्पाचा एक अचूक मंत्र आणि समस्या होतील दूर; बुधवारच्या दिवशी हे उपाय करायला विसरू नका

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Sambhaji Bhide Video : संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान, १५ ऑगस्ट अन् भगवा झेंड्यावर केले वक्तव्य

Budget Smartphone: कमीत कमी बजेटमध्ये स्मार्ट फीचर्स! १ हजार रुपयांपेक्षा स्वस्त फोनमध्ये 4G, UPI आणि कॅमेरा

SCROLL FOR NEXT