MG Windsor EV Saam Tv
बिझनेस

मिनी पण दमदार, मुंबई-पुणे-मुंबई एका चार्जमध्ये गाठणार; MG Windsor EV लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

MG Windsor EV कार भारतात लॉन्च झाली आहे. ही मिनी पण दमदार कार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी MG Motor ने भारतात आपली दमदार MG Windsor EV लॉन्च केली आहे. याची किंमत कंपनी 9.99 लाख रुपये इतकी ठेवली आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे. JSW भागीदारीत कंपनीची कार पहिली कार आहे.

या नवीन कारची बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तसेच याची डिलिव्हरी 13 ऑक्टोबरपासून सुरू होईल. ZS EV आणि Comet नंतर ही कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक कार आहे. याच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

किती आहे रेंज?

नवीन Windsor EV मध्ये 38kWh LFP बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 331 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळेल. ही कार 136hp पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते.

ग्राहकांना ड्रायव्हिंगसाठी यात इको+, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोड मिळणार. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. MG ने खरेदीदारांसाठी खास ऑफर देखील आणली आहे. जाणोनि बॅटरीवर अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी देत आहे.

नवीन एमजी Windsor मध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आहे. मात्र यातील 135 डिग्री रिक्लाइन सीट्सची (एरो-लाउंज सीट्स) सध्या चर्चेचा विषय आहे. या कारच्या सीट्स तुम्हाला सिनेमा हॉलमध्ये किंवा फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये देण्यात आल्याप्रमाणे आहे. इतर कोणत्याही कारमध्ये साध्य अशा प्रकारच्या सीट्स देण्यात आलेल्या नाहीत.

MG Windsor EV मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले केली आहेत, जे तुमच्या दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरतील. यामध्ये सेगमेंटमधील सर्वात मोठी 15.6-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली, जी सर्वात खास आहे. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला मनोरंजन आणि गेमिंगचा आनंद घेता येईल. यातच MG ही एकमेव कार कंपनी आहे जी सर्वात मोठा डिस्प्ले देते. या कारमध्ये 18 इंची अलॉय व्हील्स दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT