बिझनेस

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपवर लाँच झाले Status Ads फीचर, कसं काम करणार?

WhatsApp Status Ads: व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटसवर जाहिराती येण्याचे नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे. या जाहिराती कोण पाहू शकेल, कसे कार्य करेल आणि याचा अनुभवावर काय परिणाम होईल हे जाणून घ्या.

Dhanshri Shintre

व्हॉट्सअ‍ॅप आता केवळ मेसेजिंगसाठी मर्यादित राहिलेला नाही. मेटाने एक नवे ‘स्टेटस अ‍ॅड्स’ असे नवीन फीचर सुरू केले आहे. यामुळे आता यूजर्सना इन्स्टाग्राम किंवा फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटस सेक्शनमध्येही जाहिराती पाहायला मिळणार आहेत. या नव्या स्टेटस अ‍ॅड्स फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती कशा दिसतील आणि त्या कुठे दिसतील आणि यूजर्सवर त्याचा कसा परिणाम होईल ते जाणून घ्या.

वापरकर्त्याच्या संपर्कांद्वारे पोस्ट केलेल्या स्टेटसदरम्यान, मेटाकडून प्रकाशित केलेल्या जाहिराती स्क्रोल करताना दिसतील. इन्स्टाग्राम स्टोरीप्रमाणे या जाहिराती २४ तासांसाठी दिसणार असून स्टेटस अनुभवामध्ये बदल घडवणार आहेत. या जाहिराती मेटाकडून दाखवण्यात येणार आहेत. तुम्ही त्या इतर स्टेटसप्रमाणे स्वाइप करून बदलू शकता. हे फीचर इन्स्टाग्राम किंवा फेसबुक स्टोरीजसारखेच आहे, जे यूजर्सचे अनुभव बदलू शकते.

व्हॉट्सअ‍ॅपवर आता मोबाईल, वेब सिरीज ट्रेलर, फॅशन, फूड ब्रँड्स आणि ई-कॉमर्स ऑफर्ससारख्या जाहिराती पाहायला मिळतात. या जाहिराती केवळ चॅनेलवर दिसतात. तुमचे चॅट्स अजूनही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील, म्हणजे कोणीही ते वाचू शकत नाही. मेटा तुमच्या अ‍ॅप वापराच्या सवयी आणि स्टेटस व्ह्यूइंग पॅटर्नवर आधारित जाहिराती दाखवणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या स्टेटस जाहिराती बंद करण्याचा कोणताही पर्याय नाही. मेटा या फीचरचा विस्तार हळूहळू सर्व यूजर्सपर्यंत करत आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप आता कमाईचं माध्यम बनत आहे. वैयक्तिक परिणाम न होतानाही, यूजर्सचा अनुभव काहीसा बदलेल. हा बदल ग्राहकांना किती पसंत पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Chanakya Niti: 'या' ६ लोकांना कधीही आर्थिक मदत देणे टाळा, ते तुमच्या पैशाचा नाश करतात

Railway Ticket Offer : रेल्वेची भन्नाट योजना, तिकिटावर २० टक्के सूट, अट फक्त एकच

Better half chi love story: लव्हस्टोरी, घोस्ट आणि कॉमेडीचा धमाका; 'बेटर-हाफची लव्हस्टोरी'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT